शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात औद्योगिक विकास खुंटला

By admin | Updated: August 14, 2016 00:32 IST

चंद्रपूर तालुक्याचे विभाजन २५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर बल्लारपूर तालुका १४ मार्च २००२ ला अस्तित्वात आला.

प्रशासनाचे दुर्लक्ष : एमआयडीसी वसाहत नाहीअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरचंद्रपूर तालुक्याचे विभाजन २५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर बल्लारपूर तालुका १४ मार्च २००२ ला अस्तित्वात आला. तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसी वसाहत होणे गरजेचे आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे बल्लारपूर तालुक्यात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली नाही. परिणामी तालुक्याचा औद्योगिक विकास मंदावला असून बेरोजगारीचे संकट वाढले आहे.बल्लारपूर शहरात जागतिक दर्जाचा पेपर मिल उद्योग, वेकोलिच्या कोळसा खाणी, पाईप उद्योग, साग लाकडाचे आगार, खर्डा उद्योगाच्या माध्यमातून कामगारांना रोजगार मिळत आहे. यातील बरेच उद्योग डबघाईस आले आहेत. बल्लारपूर तालुक्यातील वीज औष्णिक केंद्र, प्लायवूड कंपनी, चुना फॅक्टरी कित्येक वर्षांपासून बंद झाले आहेत. उद्योगाचे पुनर्गठन करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी बल्लारशाह औष्णिक वीज केंद्राच्या तब्बल १०५ हेक्टर पडित जागेवर औद्योकि वसाहत उभी करण्याचे सुतोवाच जनप्रतिनिधीने केले होते. मात्र ती घोषणा हवेत विरली. यामुळे बल्लारपूर तालुक्यात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.बल्लारपूर तालुका निर्मितीनंतर तालुक्यात शासन स्तरावरुन एमआयडीसी वसाहतीचे नियोजन करणे क्रमप्राप्त होते. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी औद्योगिक वसाहतीचे स्वप्न आजतागायत साकार झालेच नाही. यामुळे बेरोजगारीची समस्या कायम आहे. बल्लारपूर तालुका वनक्षेत्राला लागून आहे. महसूल प्रशासनाची जागा सैनिकी शाळा व काही बॉटनिकल गार्डन निर्माण करण्यासाठी आरक्षित करण्यात आली. त्यामुळे भविष्याचा वेध घेताना तालुक्यात एमआयडीसी निर्माण करण्यासाठी जागा शोधण्याची वेळ औद्योगिक विकास महामंडळावर येणार आहे.एमआयडीसी अस्तित्वात न आल्यामुळे लहान मोठे उद्योजक अडचणीत आले आहेत. शहरातील पाईप फॅक्टरीसारख्या उद्योगावर अवकळा आली आहे. एकमेव मोठा पेपर मिल उद्योग कच्च्या मालाअभावी संकटाच्या सावटात सापडला. काही उद्योग तालुक्यातून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी बल्लारपूर तालुक्यात राजकीय इच्छाशक्तीला जागृत करून एमआयडीसीची स्थापना होणे, काळाची गरज आहे.