शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

भारतापुढे कोरियाचे खडतर आव्हान

By admin | Updated: September 15, 2015 03:13 IST

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सायना नेहवालविना सहभागी होत असल्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटूंना मंगळवारपासून प्रांरभ होत असलेल्या कोरिया सुपर सिरीज

रवी जवळे ल्ल चंद्रपूर‘इडीयट बॉक्स’चे वेड जसे पूर्वी होते, तसे आजही आहे. उलट हे वेड विविध वाहिन्यांमुळे वाढले आहे. पूर्वी खासगी वाहिन्या कार्यरत नसताना ‘दूरदर्शन’ शिवाय पर्याय नसायचा. घरोघरी दूरदर्शनच बघितले जायचे. आता असंख्य वाहिन्या आल्या असल्या तरी दूरदर्शनची मजा औरच आहे. एका उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्रासह सात लघुशक्ती व तीन अतिलघुशक्ती प्रक्षेपण केंद्राच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात दूरदर्शनने आपली जादू कायम ठेवली आहे. मात्र रिक्त पदांचे ग्रहण या केंद्रालाही लागले आहे. रिक्त पदांमुळे एखादवेळी तांत्रिक अडचणींचा येथील अधिकाऱ्यांना सामना करावा लागतो.दिल्ली आणि मुंबईवरून प्रक्षेपित होणारे कार्यक्रम उपग्रहाद्वारे ‘रिसीव्ह’ करणे व येथील ट्रान्समीटरद्वारे त्याची शक्ती वाढवून चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात प्रक्षेपण करणे असे कार्य चंद्रपुरातील दूरदर्शन केंद्रातून सुरू आहे. पूर्वी चंद्रपूर येथे उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र होते. या केंद्राद्वारे केवळ ३५ ते ४० किलोमीटरपर्यंत दूरदर्शनचे कार्यक्रम प्रक्षेपित होत होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात दूरदर्शन दिसायचे नाही. गडचिरोली जिल्ह्यातही दूरदर्शनचे जाळे पसरू शकले नव्हते. मात्र हळूहळू चंद्रपुरातील उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्राला लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र जोडण्याचे काम करण्यात आले. १९९९ पर्यंत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक भागात दूरदर्शन दिसू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली. सद्यस्थितीत अहेरी, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वणी, पांढरकवडा या ठिकाणी लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले आहे. २० ते २५ किलोमीटरपर्यंत या केंद्राद्वारे दूरदर्शनचे कार्यक्रम पोहचविले जातात. तरीही अनेक भागात दूरदर्शन व्यवस्थित दिसत नसल्याने पुढे चिमूर, सिंदेवाही व कुरखेडा येथे अतिलघुशक्ती प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले. या केंद्रांमुळे प्रक्षेपणाची मर्यादा आणखी १० किलोमीटरने वाढविण्यात आली. लघुशक्ती प्रक्षेपण केंद्रात अधिकारी कार्यरत आहेत. काही तांत्रिक अडचणी आल्या तर तेथील अधिकारी त्याच पातळीवर त्या सोडवितात. मात्र मोठा तांत्रिक बिघाड आला किंवा स्पेअर पार्ट्स बदलायची गरज पडल्यास चंद्रपुरातून अधिकाऱ्यांना स्पेअर पार्ट घेऊन त्या गावी जावे लागत असल्याची माहिती येथील अधिकारी आर.जी. चामाटे व पी.पी. निखार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण४चंद्रपुरात दूरदर्शनचे उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र व अनुरक्षण केंद्र आहे. या ठिकाणी तांत्रिक कामासह प्रशासकीय कामेही केली जातात. मात्र चंद्रपुरातील उपनिदेशक (अभियांत्रिकी) हे मुख्य पदच अनेक वर्षांपासून रिक्त आहे. नागपूरचे अधिकारी (अभियांत्रिकी) तुलकर यांच्याकडे येथील प्रभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय लघूशक्ती केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एका लघूशक्ती केंद्रात किमान आठ अधिकाऱ्यांची गरज आहे. मात्र प्रत्येक केंद्रात अनेक पद रिक्त आहेत. ही परिस्थिती मागील अनेक दिवसांपासून कायम आहे. असे आहे केंद्रातील मनुष्यबळ४सद्यस्थितीत चंद्रपुरातील उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्रात आठ अधिकारी (अभियांत्रिकी) तर अनुरक्षण केंद्रात तीन अधिकारी कार्यरत आहेत. येथे तांत्रिक बाबींसह प्रशासकीय कामेही केली जातात. याशिवाय अहेरी लघुशक्ती केंद्रात चार अधिकारी, भामरागडमध्ये दोन अधिकारी, सिरोंचा येथे पाच अधिकारी, गडचिरोलीमध्ये सात अधिकारी, ब्रह्मपुरीमध्ये पाच अधिकारी, वणी येथे चार अधिकारी तर पांढरकवडा केंद्रात सहा अधिकारी कार्यरत आहेत. अतिलघुशक्ती केंद्रात मात्र अधिकारी वा कर्मचाऱ्यांची गरज नसते. त्यामुळे तेथे कुणीही अधिकारी नसतो.