शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्याचे प्रतिकात्मक ध्वजारोहण

By admin | Updated: May 2, 2016 00:41 IST

वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवाद्यांचे मागील अनेक महिन्यांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. प्रवचने, व्याख्यान, आंदोलने केली जात आहे.

मोटरसायकल रॅली : जिल्ह्यात विविध ठिकाणी विदर्भवाद्यांचे आंदोलनचंद्रपूर : वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवाद्यांचे मागील अनेक महिन्यांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. प्रवचने, व्याख्यान, आंदोलने केली जात आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अनेक तालुक्यात रविवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या मागणीसाठी ध्वजारोहण करून शासनाचे लक्ष वेधले. चंद्रपुरात जनता महाविद्यालयासमोर विदर्भाचा प्रतिकात्मक ध्वज फडकाविण्यात आला. यासोबतच राजुरा, वरोरा व गोंडपिपरी येथे मोटारसायकल रॅलीसह मिरवणूक काढण्यात आली. जिल्ह्यातील मूल येथे या मागणीच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळल्या प्रकरणी युवक बिरादरी संघटनेचे अध्यक्ष कवडू येनप्रेडीवार व संतोष रामटेके यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सावली व अन्य तालुक्यातील वेगळ्या विदर्भासाठी ध्वजारोहण करण्यात आले.चंद्रपुरात सकाळी ८.३० वाजता जनता महाविद्यालयाच्या पटांगणात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वजारोहण कार्यक्रम झाला. यावेळी विदर्भ राज्य झालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी जिल्हाभरातून उपस्थित झालेल्या विदर्भवाद्यांना स्वतंत्र विदर्भ राज्याची शपथ दिली. यावेळी विदर्भ राज्य आघाडीचे बंडू धोत्रे, अ‍ॅड. विजय मोगरे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. प्रतिभा जीवतोडे, प्राचार्य प्रभू चोथवे, डॉ. एम. सुभाष, डॉ. इसादास भडके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, सचिव केशव जेनेकर, भाऊराव निखाडे, रत्नमाला बावणे आदी उपस्थित होते.राजुरा येथील नेहरू चौकात वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. ताराचंद लांडे यांच्या हस्ते वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला.यावेळी बंडू माणूसमारे, दिगंबर डोहे आदी उपस्थित होते. राजुरा येथे भूमिपूत्र युवा संघटनेच्या वतीने माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर मौलाना आझाद चौकात विदर्भाचे प्रतिकात्मक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हरिदास झाडे, लता ठाकरे, भावना ताठे, बापुराव मडावी, नितीन आंबडकर, संतोष देरकर, किसन मुसळे आदी उपस्थित होते.सावली येथील पत्रकार भवनासमोर विदर्भवाद्यांकडून विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी बहुसंख्य विदर्भवादी नागरिक उपस्थित होते. गोंडपिपरी येथे भूमिपुत्र युवा संघटनेच्या वतीने मोटर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य अमर बोडलावार, पुरुषोत्तम वाघ, इंद्रपाल धुडसे, संजय वडस्कर आदी उपस्थित होते. ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद चौका विदर्भाचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, सुधीर सेलोकर, माजी आमदार उध्दवराव सिंगाडे, सुधदेव प्रधान, अशोक रामटेके, प्राचार्य देवीदास जगनाडे आदी उपस्थित होते. मूल येथील गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समिती व युवक बिरादरी संघटनेच्या वतीने विदर्भाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विदर्भवाद्यांनी १ मे हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळला. या आंदोलनादरम्यान युवक बिरादरी संघटनेचे अध्यक्ष कवडू येनप्रेड्डीवार आणि संतोष रामटेके यांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली. (शहर प्रतिनिधी)