यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे-सोळंके, उपजिल्हाधिकारी (भू.) प्रियंका पवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडाळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शुभांगी कनवाडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी कोविड केअर सेंटरमधील उपलब्ध बेड्सची माहिती जाणून घेतली. कोविड केअर सेंटरमधील बेड भरल्यानंतरच रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना दिल्या. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सेंटर सुरू आहेत. यासाठी अधिकाधिक नागरिकांच्या तपासण्या व्हाव्यात. स्वॅब कलेक्शन केंद्राचा कालावधी वाढवून ते दोन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवावा. टेस्टिंग टीमशी समन्वय साधून २४ तासांत रुग्णाचा अहवाल मिळावा यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून अहवाल लवकर प्राप्त झाल्याने रुग्णांचे वेळेत निदान होऊन रुग्ण चांगल्या स्थितीत असताना त्याच्यावर उपचार करणे शक्य होते. परिणामी मृत्यूदरातही घट होते, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.