शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ

By admin | Updated: July 12, 2015 01:23 IST

रान डुक्कर, हरिण, रानगवा, रोही, माकड, वानर तसेच वन्य हत्ती या व अन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची

चंद्रपूर : रान डुक्कर, हरिण, रानगवा, रोही, माकड, वानर तसेच वन्य हत्ती या व अन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम अपुरी असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाबद्दल जनसामान्यात प्रतिकुल मत निर्माण होत आहे. त्यामुळे सदर रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय वनविभागाने ९ जुलै २०१५ रोजी निर्गमित केला आहे.महसुल व वनविभागाच्या ५ सप्टेंबर २०१३ च्या शासन निर्णयान्वये शेतपिकाचे दोन हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्यास पूर्ण, परंतु किमान ७०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येत होती. त्यात वाढ करुन ९ जुलै २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये शेतपिकाचे नुकसान १० हजार रुपयांपर्यंत झाल्यास पूर्ण परंतु किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतपिकाचे नुकसान दहा हजार रुपयांपेक्षा जास्त झाल्यास पूर्वी आठ हजार रु. अधिक १० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसानीच्या ४० टक्के रक्कम (१८ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत) नुकसान भरपाई देण्यात येत होती. त्यात वाढ करून शेतपिकाचे नुकसान १० हजारपेक्षा जास्त झाल्यास दहा हजार रुपये अधिक १० हजारच्या वरील नुकसानीच्या ८० टक्के रकम (२५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत) नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस पिकाचे नुकसान झाल्यास पूर्वी ४०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येत होती आता ८०० रु. प्रति मे.टन प्रमाणे २५ हजारच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.फळबागांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यातसुद्धा भरीव वाढ करण्यात आली आहे. पूर्वी नारळासाठी २४०० रुपये प्रति झाड नुकसान भरपाई देण्यात येत होती. त्यात वाढ करून ४८०० रुपये प्रति झाड नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुपारीसाठी देण्यात येणाऱ्या १४०० रुपये प्रति झाड नुकसान भरपाईत वाढ करून २८०० रुपये प्रति झाड, कलमी आंब्यासाठी देण्यात येणाऱ्या १८०० रु. प्रति झाड नुकसान भरपाईत वाढ करून ३६०० रु. प्रति झाड, केळीसाठी नुकसान भरपाईत वाढ करून १२० रुपये प्रति झाड देण्याचा निर्णय घेण्यात आला. (शहर प्रतिनिधी)