शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांच्या भत्त्यात वाढ

By admin | Updated: September 18, 2014 23:32 IST

शासनाने सरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करीत दिवाळीची भेट दिली आहे. सरपंचांना लोकसंख्येनुसार देण्यात येणाऱ्या मानधनात ७५ टक्के अनुदान राज्य शासन देणार आहे. तर २५ टक्के अनुदान

खडसंगी : शासनाने सरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करीत दिवाळीची भेट दिली आहे. सरपंचांना लोकसंख्येनुसार देण्यात येणाऱ्या मानधनात ७५ टक्के अनुदान राज्य शासन देणार आहे. तर २५ टक्के अनुदान हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिले जाणार आहे. सरपंचांच्या मानधनाबरोबर ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठक भत्त्यातही तब्बल आठ पटीने वाढ करण्यात आली आहे.गावाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना नाममात्र २५ रुपये बैठक भत्ता देण्यात येत होता. त्यामुळे सदस्य बैठकीला हजर राहणे टाळत होते. ही बाब लक्षात आल्याने शासनाने आता ग्रामपंचायत सदस्याचा बैठक भत्ता २५ रुपयावरून तब्बल २०० रुपये केल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कामकाजात सहभागी होण्याविषयी गोडी निर्माण होणार आहे.मासिक बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या सदस्यांची वाढत्या भत्त्यामुळे बैठकांना उपस्थिती वाढणार आहे. यापूर्वी दोन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ६०० रुपये तर त्यावरील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ८०० रुपये दरमहा मानधन दिले जात होते. शासनाच्या निर्णयानुसार नव्याने हे मानधन एक हजार, दीड हजार आणि दोन हजार रुपये करण्यात आले आहे तर सदस्यांना बैठक भत्ता सरसकट वाढवून २०० रुपये करण्यात आला आहे. (वार्ताहर)