शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जागा उपलब्ध होण्यापूर्वीच पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन

By admin | Updated: October 5, 2015 01:35 IST

एक वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात खनिज निधीतून मंजूर झालेल्या साडेपाच कोटीच्या घूग्घुस पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन ...

घुग्घुस : एक वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात खनिज निधीतून मंजूर झालेल्या साडेपाच कोटीच्या घूग्घुस पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन राज्याचे वर्तमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते. अलिकडेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मात्र नुकतेच घुग्घूस ग्रामपंचायतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चंद्रपूर उपविभागाकडून जलशुद्धीकरण सयंत्र बांधकामाकरिता नियोजित भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत पत्र प्राप्त झाले. त्यामुळे जागा उपलब्ध करण्यापूर्वीच उद्घाटनाची घाई का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर पाणी पुरवठा योजनेबाबत घुग्घुस ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, हे विशेष.येथील चौधरी लेआऊटमध्ये जागा अपुरी असताना विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २४ आॅगस्टला खनिज निधीतून मंजूर झालेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेच्या जलशुद्धीकरण सयंत्र बांधकामाकरिता पुरेशी जागा उपलब्ध नव्हती, हे त्या विभागाला माहिती होते मात्र तत्कालिन उपसरपंच निरीक्षण तांड्रा व जि.प. विद्यमान बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी नजिकच्या लेआऊटमधील जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्ष होऊनही जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. नियोजित जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे पत्र जीवन प्राधिकरणाच्या चंद्रपूर उपविभागाने नुकतेच ग्रामपंचायतीला पाठविले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका ४ आॅगस्टला झाल्या. या निवडणुकीत भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस बहुमताने विजयी झाली. ७ सप्टेंबरला सरपंचपदाची निवडणूक झाली. त्यात काँग्रेसच्या पुष्पा मेश्राम यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांनी १० सप्टेंबरला पदाची सूत्रे हाती घेताच वरील विषयासंदर्भातील पत्र पुष्पा मेश्राम यांच्या हातील पडले, तेव्हा सर्वच पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सचिवाकडे याबाबत चौकशी केली असता सदर योजनेचे कोणतेही दस्तावेज ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसून वरिष्ठ पातळीवरच योजनेचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विषयात आता ग्रामपंचायतीचे नवे पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)