शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरीत ‘ई-लायब्ररी’चे उद्घाटन

By admin | Updated: September 8, 2015 00:49 IST

स्थानिक नगर पंचायत अंतर्गत नागरिकांना सेवा देणाऱ्या महात्मा गांधी वाचनालय इमारतीत शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवारी ‘ई-लायब्ररी’चे उद्घाटन पार पडले.

जिल्ह्यातील प्रथम सेवा : विद्यार्थ्यांना पडणार उपयोगीगोंडपिंपरी : स्थानिक नगर पंचायत अंतर्गत नागरिकांना सेवा देणाऱ्या महात्मा गांधी वाचनालय इमारतीत शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवारी ‘ई-लायब्ररी’चे उद्घाटन पार पडले. अशा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच लायब्ररी आहे. कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणूून उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत प्रशासक तथा तहसीलदार मलिक विराणी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेची पूजा करुन करण्यात आली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी पराते म्हणाले, मानवी जीवनाचा ग्रंथालय अविभाज्य घटक असून येथे सर्व प्रकारचे ज्ञानार्जन करता येते. ‘वाचाल तर वाचाल’ असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्यांने करुन ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून उज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.ई- लायब्ररी ही काळाची गरज असून येथे लवकरच दहा संंगणक संच उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पराते यांनी दिली. तर प्रास्ताविकामध्ये तहसीलदार मलिक विराणी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, ग्रंथालय हे एक पवित्र ज्ञानार्जन स्थान असून प्रत्येक मानसाने व विद्यार्थ्यांने वाचनातूनच प्रगतीच्या वाटेवरील अडचणींचा सामना करण्याची जिद्द व शक्ती ते प्राप्त करु शकतात. आणि भविष्य उज्ज्वलमय घडवू शकतात, असे ते म्हणाले. या लायब्ररीचा विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करावा, नक्कीच लायब्ररीचा फायदा होईल, असेही तहसीलदारांनी सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने गावातील बहुतांश प्रतिष्ठित नागरिक, नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बंडू झाडे, प्रास्ताविक तहसीलदार तथा प्रशासक मलिक विराणी यांनी तर आभार ग्रंथपाल आनंद वनकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)