शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांच्या नशिबी उपेक्षा

By admin | Updated: August 3, 2014 00:02 IST

देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्याच शेतीमध्ये घाम गाळणारा धान उत्पादक शेतकरी आजघडीला उपेक्षित जीवन जगत आहे. तालुक्याला धान उत्पादक शेतकरी आजही कर्जाच्या

शेतकरी हतबल : आर्थिक मदत देण्याची मागणीसिंदेवाही : देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्याच शेतीमध्ये घाम गाळणारा धान उत्पादक शेतकरी आजघडीला उपेक्षित जीवन जगत आहे. तालुक्याला धान उत्पादक शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्यात वावरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळाच्या छायेत वावरणारा शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकला नाही. जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी हलाखीचे जीवन जगत आहे. मात्र त्यांच्याकडे शासन, प्रशासन सातत्याने दुर्र्लक्ष करीत आहे. दिवसेंदिवस कर्जाचे ओझे वाढत आहे. दिवस-रात्र शेतीमध्ये घाम गाळणाऱ्या धान उत्पादकाच्या नशिबी मात्र कर्जाच्या अभिशापाचे वरदान तर नाही ना, असे म्हणावे लागत आहे. शेतकऱ्यांना भेडसाविणाऱ्या समस्या सातत्याने पाठलाग करीत आहे. धान उत्पादकाचे हित जोपसण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता केली जात नाही. शेतकरी कोणत्याही कष्टाची पर्वा न करता शेतीमध्ये राबतो. उभे आयुष्य शेतीच्या मशागतीमध्ये खर्ची घालणाऱ्या शेतकऱ्यांना थोडीशीही उसंत मिळत नाही. अन्नधान्याचा पुरवठा करण्यात महत्वाची भुमिका बजावणारा धान उत्पादक शेतकरी पूर्णत: मानसिकरिताय खचून गेला आहे. एकमेव शेतीच्या मुख्य व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. काही वर्षापूर्वी धानाची शेती परवडणारी होती. शेतीच्या माध्यमातून राजवैभव उपभोगण्याचा योगसुद्धा आला. परंतु आज तशी परिस्थिती नाही. धान उत्पादकासाठी आवश्यक इतर पूरक साहित्याच्या किंमती दामदुपटीने वाढल्या. पर्यायाने धानाचे उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे. ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठी शोकांतिका आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)