शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरीचा फुटलेला नहर त्वरित दुरूस्त करा - अविनाश वारजुकर

By admin | Updated: October 5, 2015 01:32 IST

धानाचे पीक अंतिम टप्प्यात आले असताना ऐनवेळी घोडाझरी तलावाचा नहर फुटला. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेली १५०० एकर शेती संकटात सापडली आहे.

नागभीड : धानाचे पीक अंतिम टप्प्यात आले असताना ऐनवेळी घोडाझरी तलावाचा नहर फुटला. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेली १५०० एकर शेती संकटात सापडली आहे. फुटलेला नहर त्वरित दुरूस्त करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा घोडाझरी तलावाच्या कार्यालयाला कुलुप ठोकू, असा इशारा माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांनी दिला आहे.घोडाझरी तलावाला १०७ वर्षाचा इतिहास आहे. आजही या तलावाचे आणि नहराचे काम मजबुत आहे. मात्र दोन वर्षाअगोदर नहराच्या लाईनिंगचे काम ज्या ठिकाणी करण्यात आले नेमका त्याच ठिकाणी नहर फुटला. यावरून अधिकारी आणि कंत्राटदार यांनी हे काम कशाप्रकारे केले असेल याची कल्पना येते. या संपुर्ण कामाची चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. वारजुकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.सद्यस्थितीत धानाचे पीक अंतिम टप्प्यात आले आहे. या काळात धानपीकाला पाण्याची नितांत गरज असते. नदी नाल्याला पाणीच नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी धान पिकाचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांची आणि धानपिकाची गरज लक्षात घेवून विभागाने त्वरीत या नहराची दुरूस्ती करावी व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही वारजुकर यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपआपल्या समस्या डॉ. वारजुकर यांचेकडे मांडल्या. नरहाला दिलेल्या भेटीच्यावेळी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जि.प. सदस्या पद्माताई कामडी, प्रमोद चौधरी, आनंद भरडकर, मधुकर बावणकर, प्रतिक भसीन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)