शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व कामांची तत्काळ अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचे आकलन करून कोरोना विषाणू व पाऊस या दोन्हीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये सर्व विभागांनी समन्वयाने ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचे आकलन करून कोरोना विषाणू व पाऊस या दोन्हीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे तसेच तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सोमवारी ते बोलत होते.

यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पावसाळ्यात येणाऱ्या वादळामुळे झाडे रस्त्यावर उन्मळून पडतात. त्यासाठी बांधकाम विभाग व नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीने याबाबत दक्षता घ्यावी, मुख्य रस्त्यावरून ऑक्सिजन सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टँकरला अडथळा निर्माण होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. वीज वितरण कंपनीने पथक सज्ज ठेवावे. रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण असल्याने वीज पुरवठा अबाधित राहावा, यासाठी रुग्णालयाने बॅकअप इलेक्ट्रिकल्स, जनरेटरची पूर्तता करून ठेवावी. पाटबंधारे विभागाने सर्व धरणांची तपासणी करून गळती दुरुस्तीची कार्यवाही करावी. पूरबाधित संभाव्य गावांची यादी तयार करून आपत्ती व्यवस्थापन कक्षात सादर करण्याच्या सूचना दिल्या. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्राने इरई धरणाचे गेट उघडताना नागरिकांना अलर्ट करण्याची यंत्रणा उभारावी. धोकादायक पुलांचा अहवाल सादर करावा, याकडेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी लक्ष वेधले.

रुग्णवाहिका सज्ज ठेवा

आपत्तीच्या काळात रुग्णवाहिका आराखडा व ट्रोल फ्री क्रमांक कार्यान्वित करावा, रुग्णवाहिकांची तपासणी करावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषधी साठा उपलब्ध करून ठेवावा. पालिका हद्दीतील जुन्या इमारतींची पावसाळ्यापूर्वी तपासणी करावी. तालुका व ग्रामस्तरीय समितीच्या मान्सूनपूर्व बैठका घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी संबंधित विभागाला दिल्या. झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तालुका अधिकाऱ्यांशी संवाद साधून अलर्ट राहावे व मुख्यालय सोडू नये, असे निर्देश दिले.