शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीररीत्या केबल प्रसारणाचा व्यवसाय

By admin | Updated: September 16, 2015 01:05 IST

मागील १५ वर्षापासून ब्रह्मपुरी शहरात केबलचा व्यवसाय सुरू असताना त्यांना सेवेपासून मुक्त करण्याचा डाव युसीएन कंपनीने रचून आपला बेकायदेशीर व्यवसाय सुरु केला आहे.

कार्यवाही करण्याची मागणी : जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे तक्रारब्रह्मपुरी : मागील १५ वर्षापासून ब्रह्मपुरी शहरात केबलचा व्यवसाय सुरू असताना त्यांना सेवेपासून मुक्त करण्याचा डाव युसीएन कंपनीने रचून आपला बेकायदेशीर व्यवसाय सुरु केला आहे. कोणतीही परवानगी न घेता आपला व्यवसाय भरभराटीस आणून शासनाची दिशाभूल केली असल्याने युसीएन कंपनीवर कठोर कार्यवाही करावी व आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा याबाबत शहरातील केबल चालकांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. शहरातील संपूर्ण केबलधारक मागील १५ वर्षापासून ब्रह्मपुरी शहराला सेवा देत आहेत. त्या व्यवसायासाठी आवश्यक परवाना जिल्हाधिकारी चंद्रपूर व जिल्हा पोस्टमास्तर चंद्रपूर यांच्याकडून घेतला आहे. तसेच सरकारचा मनोरंजन कर वेळोवेळी भरत आहेत. सदर वाहिन्यांचे प्रसारण युसीएन केबल नेटवर्क कंपनी नागभीड द्वारे केले जात होते. परंतु अचानक कंपनीने एकाधिकार शाहीचा वापर करुन मासिक शुल्कात मोठी वाढ केली. ती भरण्याचे एक मोठे आव्हान आम्हाला पेलले नाही. किंबहूना कंपनीने आमचे म्हणणे ऐकूनही घेतले नाही व आम्हाला पूर्वसूचना न देता आमचे प्रसारण डिसेंबर २०१४ पासून बंद केले. त्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो , असे केबल चालकांचे म्हणणे आहे. आम्ही स्वत:ची कंट्रोल रुम चालू केली व आपला रोजगार वाचविला असता युसीएन कंपनीने पोस्टाचा परवाना व जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना न घेता विनापरवाना व्यवसाय सुरु केल्याने आमच्या व्यवसायाशी व शासनाच्या धोरणाविषयी युसीएन कंपनीने खेळ सुरु करुन बेकायदेशीर धोरण अवलंबिला आहे. या अडेलतटू व बेकायदेशीर धोरणाने आमच्या स्वतंत्र व्यवसायावर परिणाम झाला असून या कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करावी व व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी अनिल रणदिवे, नामदेव बंडे, युसूफ पठाण, राजीव नगराळे, अनिल बघेले, सुरेश कावळे, दिलीप मेश्राम आदी केबलचालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)