शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

बीजभांडवल कर्ज भरण्यास दुर्लक्ष

By admin | Updated: July 3, 2015 01:27 IST

सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

उद्योग केंद्राला फटका : कर्जफेडीबाबत कर्जदार उदासीनचंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. विविध विभागांसोबत उद्योग केंद्रामार्फतही बेरोजगारांना लघु व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. मात्र, घेतलेले कर्ज परत देण्यासाठी बेरोजगारांची टाळाटाळ सुरु आहे. यामुळे उद्योग केंद्राला लाखोंचा चुना लागत आहे. प्रत्येकांना नोकरी मिळणे कठीण झाले असून नोकरी सोडून सुशिक्षित बेरोजगार छोट्या-मोठ्या उद्योगांच्या मागे लागले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योग उभारणी, कर्ज, मार्गदर्शन करण्याचे काम सुरु आहे. या केंद्राचे पंतप्रधान रोजगार निर्मिती आणि बीजभांडवल, असे रोजगाराचे दोन उपक्रम आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या माध्यमातून बेरोजगारांना बँकेतून व्यवसायासाठी थेट कर्ज मिळते. कर्जाची ही पद्धत क्लिष्ट आहे. छोटे व्यवसाय करता यावे, यासाठी बीजभांडवल योजना आहे. याअंतर्गत एकूण कर्जाच्या १५ टक्के रक्कम जिल्हा उद्योग केंद्र देते.१९९३-९४ पासून ही योजना सुरु आहे. बीजभांडवल योजनेतून आतापर्यंत १६१ सुशिक्षित बेरोजगारांनी छोट्या उद्योगांसाठी कर्ज घेतले. या कर्जातून अनेकांनी आपले व्यवसाय सुरु केले. व्यवसाय स्थिरावल्यानंतर कर्जाची ही रक्कम सहा टक्क्यांच्या दराने पाच वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला परत करावी लागते. मात्र, कर्ज परतफेडीचा विसर सुशिक्षित बेरोजगारांना पडत आहे.बोटावर मोजण्याइतकेच कर्जदार नियमितपणे कर्ज फेडत असल्याची माहिती आहे. कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या पायऱ्या चढणारे आता त्याच्या परतफेडीसाठी वेगवेगळी कारणे पुढे करीत असून कर्ज थकीत आहे. या वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षकही त्रस्त झालेत. आता तर त्यांची कर्ज परत मिळण्याची आशाही सोडल्याचे ते सांगतात. (स्थानिक प्रतिनिधी)