शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

खबरदारी पाळल्यास कोरोनाविरूद्धचा लढा जिंंकणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

प्रशासनाशी बांधिलकी कायम ठेवून कर्तव्याला प्राधान्य देत कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी ते दोन महिन्यापासुन मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय कर्तव्य बजावताना नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका आहे. नागपूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर राज्यात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण २६.३ टक्के आहे.

ठळक मुद्देसंजय जयस्वाल : नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक म्हणून स्वजिल्ह्याकडेही लक्ष

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोना वायरसमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. या साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजबद्ध उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी खबरदारी पाळल्यास कोरोनाविरूद्ध लढा हा देश निश्चितपणे जिंकू शकतो असे मत नागभीडचे सुपूत्र तथा नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. जयस्वाल यांचा जन्म नागभीड येथे झाला. १२ वी पर्यंत शिक्षण येथेच पूर्ण केले. वडील नागभीड येथे रेल्वे विभागात नोकरीला होते. डॉ. जयस्वाल यांनी काही वर्ष गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा दिली. प्रशासनाशी बांधिलकी कायम ठेवून कर्तव्याला प्राधान्य देत कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी ते दोन महिन्यापासुन मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय कर्तव्य बजावताना नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका आहे. नागपूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर राज्यात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण २६.३ टक्के आहे. मात्र नागपूर येथे कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करा, असे आवाहन डॉ. जयस्वाल यांनी केले.जुन्या मित्रांशी संवाद कायमआरोग्य उपसंचालक डॉ.जयस्वाल यांची नाळ अजूनही नागभीड शहराशी जुळली आहे. शैक्षणिक जीवनातील त्यांचे अनेक मित्र आहेत. मित्रांशी त्यांचा कायम संवाद असतो. प्रशासकीय व्यस्त जीवनातही ते वेळ काढून शहरात येतात.आरोग्य सेवेत ‘टिमवर्क’ चे भान ठेवाआरोग्य क्षेत्रात सेवा देण्यासाठी टीमवर्क महत्त्वाची असते. प्रत्येक शासकीय विभागांचा यात सहभाग असतो. कोरोनाचा प्रतिकार करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. मात्र, टिमवर्कच्या माध्यमातून आरोग्य विभाग ताकदीने सामना करीत आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या