शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सभापती चोखारे तर उपसभापतिपदी डवरे

By admin | Updated: May 11, 2016 01:23 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी बाजार समितीच्या सभागृहात

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी दुपारी ३ वाजता निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांची दोन गटात विभागणी झाली. अंत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीने सभापतीपदी दिनेश चोखारे यांची तर उपसभापती पदी त्याच गटाचे रणजित डवरे यांची निवड झाली.सभापती पदासाठी काँग्रेसचे गंगाधर वैद्य व त्याच पक्षाचे दिनेश चोखारे यांच्यात लढत झाली. तर उपसभापती पदासाठी भाजपाचे सुनील फरकाडे व त्याच पक्षाचे रणजित डवरे यांच्यात लढत झाली. दोन्ही पदाच्या निवडणुकीत उमेदवारांना समान मते मिळाली. अखेर ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात आली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ निवडण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात पार पडली. या निवडणुकीत एकूण १८ जागांपैकी काँग्रेस प्रणित सहकार आघाडीने १३ जागांवर विजय मिळविला होता. ४ जागा भाजपाने तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. मंगळवारी सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या गंगाधर वैद्य गटात सहा तर दिनेश चोखारे यांच्या गटात सात सदस्य विभागले गेले. हीच स्थिती भाजपाच्या उमेदवाराचीही झाली.चार पैकी एक संचालक दिनेश चोखारे गटाला मिळाला. त्यानी एका अपक्ष उमेदवाराला आपल्याकडे ओढले. दिनेश चोखारे यांच्या गटात भाजपाचे सुनिल फरकाडे, संतोष चिल्लावार, अरविंद चवरे यांच्यासह गोविंदा पोडे, अल्का वाढई, विजय टोंगे, शोभा ठाकरे, शिला मेकलवार सामिल झाले. सभापती पदासाठी दिनेश चोखारे, गंगाधर वैद्य व योगेश बोबडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. मात्र बोबडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गंगाधर वैद्य व दिनेश चोखारे यांच्यात लढत होऊन ९-९ अशी समान मते मिळाली. गोवरीच्या बालकाने काढली ईश्वरचिठ्ठी४राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी प्रभाकर ईटनकर यांचा नऊ वर्षाचा मुलगा गोविंद हा वडिलासोबत येथील बाजार समितीत आला होता. आजच निवडणूक झाली आणि सभापती व उपसभापती पदासाठी उभे असणाऱ्या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. यामुळे गोविंद प्रभाकर ईटनकर या बालकाच्या हाताने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा भाजपाला फायदा४चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १८ पैकी १३ जागावर काँग्रेसचे संचालक निवडून आले. यामुळे येथील बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. भाजपाकडे केवळ चार सदस्य होते. त्यांनी पदाची आशा सोडली होती. मात्र सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत पदासाठी अंतर्गत विभागणी झाली. दोन्ही गटाकडे सदस्य संख्या ९-९ झाली. परिणामी दोन्ही गटाकडून उपसभापती पदाचे उमेदवार म्हणून भाजपाचे सुनील फरकाडे व रणजित डवरे यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा उचलून भाजपाने उपसभापती पदावर ताबा मिळविला.