शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांच्या निवासासाठी बंगल्याची शोधाशोध !

By admin | Updated: June 28, 2014 23:30 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पहिले आयुक्त प्रकाश बोखड यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते राहात असलेल्या रायगड या बंगल्यात आता चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय दैने राहात असल्याने मनपाचे नवे

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पहिले आयुक्त प्रकाश बोखड यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते राहात असलेल्या रायगड या बंगल्यात आता चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय दैने राहात असल्याने मनपाचे नवे आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यासाठी बंगलाच नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे शंभरकर यांच्यासाठी मनपाने नव्या बंगल्याचा शोध सुरू केला आहे.महानगरपालिकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी एन.बी. वटी यांनी काही काळ कार्यभार सांभाळला. त्यांना सुरूवातीपासूनच शासकीय बंगला मिळाला होता. त्यामुळे महानगरपालिकेला टेंशन नव्हते. महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच पहिले आयुक्त म्हणून प्रकाश बोखड रूजू झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला सिव्हील लााईन्समधील रायगड नामक बंगला बोखड यांना देण्यात आला. या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च केले. तीन महिन्यापूर्वी प्रकाश बोखड सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रायगड बंगला रिकामा झाला. दरम्यानच्या काळात चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून राहिलेले आशुतोष सलील यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आणि त्यांच्या जागी संजय दैने यांची नियुक्ती करण्यात आली. रायगड बंगला रिकामा होता. त्यामुळे तो संजय दैने यांना देण्यात आला. आता महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले, पण त्यांना हक्काचे शासकीय निवासस्थान नसल्याने त्यांनी दोन दिवसांपासून शासकीय विश्राम भवनात मुक्काम ठोकला आहे. महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चुन नुतनीकरण केलेला बंगला नव्या आयुक्तांसाठी परत मिळावा, यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना मनपाचे पदाधिकारी भेटणार आहेत. मात्र उपविभागीय अधिकारी संजय दैने बंगला सोडण्यास इच्छुक नाही. दैने यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बंगल्यावर २४ तास पाणी पुरवठा राहावा म्हणून नळाच्या मुख्य पाईपलाईनलाच होता घातला. प्रशासन आणि दैने यांच्यातील भांडण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला हा बंगला आता ते रिकामा करण्यासाठी तयार नसल्याने महानगरपालिका आणि महसूल विभाग यांच्यात पुन्हा वाजण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दरम्यान नवीन बंगला मिळेपर्यंत नवे आयुक्त सुधीर शंभरकर यांना किरायाच्या घरात किंवा शासकीय विश्रामगृहात मुक्काम ठोकावा लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)