शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: April 25, 2016 00:42 IST

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत.

वरिष्ठांनी लक्ष द्यावे : दोन वर्षांपासून अनुदान रखडलेराजुरा : विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत. मात्र या आश्रम शाळांना गत दोन वर्षांपासून अनुदान योग्य पद्धतीने न दिल्यामुळे आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. २०१४ मध्ये विद्यार्थ्यांना ६० टक्के अनुदान देण्यात आले. २०१५ मध्ये मात्र केवळ एक लाखाचे अनुदान देण्यात आले. आता वर्ष संपत आले. परंतु २०१६ चे अनुदान अजूनपर्यंत मिळालेले नाही. विमुक्त भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र योग्य वेळी अनुदान न दिल्यामुळे आश्रमशाळा चालविणे कठीण होत असल्याचा आरोप, अनंता चटप यांनी केला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील विमुक्त भटक्या जमातीच्या आश्रमशाळेत वर्ग पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी निवासी राहतात. दुर्गम भागातील मुले- मुली या आश्रमशाळेत शिक्षण घेण्याकरिता येत असतात. परंतु शासन या गरीब मुलाच्या सोई-सवलतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. एका संस्थेचे एक करोडच्यावर अनुदान मिळालेले नाही. शिक्षणाचा झरा शेवटच्या माणसापर्यंत पोहचला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असताना या विभागात कार्यरत अधिकारी मात्र निर्बंध आणत आहे. ज्याप्रमाणे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेला सातवीनंतर आठ ते दहावीपर्यंत परवानगी दिली. त्याच धर्तीवर विमुक्त जाती जमातीच्या आश्रमशाळांनासुद्धा आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे. आश्रमशाळा वाचविण्यासाठी शासनाने त्वरित अनुदान देण्याची मागणी, अनंता चटप यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)