शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या स्थापनेसाठी दीड हजारावर मंडळे सज्ज

By admin | Updated: September 15, 2015 01:19 IST

येत्या १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून सार्वजनिक गणेश मंडळाकडून यासाठी सुरू असलेली

चंद्रपूर : येत्या १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून सार्वजनिक गणेश मंडळाकडून यासाठी सुरू असलेली तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. मंडप उभारणी आणि सजावटींच्या कामाला वेग आहे. जिल्ह्यात दीड हजारावर सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार असून १० हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरवर्षीच चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव जिल्हाभरातील भक्तांच्या आकर्षणाचा विषय असतो. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तर जिल्ह्यातील भाविकांची अलोट गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्सवादरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी तगड्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उत्सवादरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही उपाययोजनाही पोलिसांनी आखल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव दारू विरहीत साजरा व्हावा, यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. गणेशाची स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीत मद्यप्राशन करणाऱ्या भक्तावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने गणेशोत्सवादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उत्सवादरम्यानच्या नियमित ड्युटीसोबतच पोलिसांपुढे दारू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हानही पेलावे लागणार आहे. (प्रतिनिधी)छेडखानींवर करडी नजर४चंद्रपूर शहरातून निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक चंद्रपुरात दाखल होतात. शहरात मोठी गर्दी होते. याचाच फायदा घेत काही गुंडप्रवृत्तीचे विकृत तरूण या मिरवणुकीत दाखल होतात. त्यांच्याकडून युवतींची छेडखानी करण्याचे प्रकारही घडतात. या युवकांच्या बंदोबस्तासाठी महिला पोलीस शिपायी तैनात राहणार आहेत. विशेष म्हणजे या महिला पोलीस खासगी गणवेशात असतील. दारू रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक४गणेशोत्सवाच्या पर्वावर परजिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची आयात केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दारू तस्कर व विक्रेते यांच्याविरुद्ध तगडी फिल्डींग लावली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात एक अधिकारी व १० पोलीस शिपाई कार्यरत राहतील. हे पथक डोळ्यात तेल घालून दारू विक्री व तस्करीवर नियंत्रण ठेवतील. तगडा पोलीस बंदोबस्त४गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी १५० पोलीस अधिकारी, दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहे. यासोबतच गृहरक्षक दलाचे ७०० जवान तैनात राहणार आहेत. त्यात ६०० पुरूष व १०० महिलांचा समावेश आहे. आटीबीपीची तुकडीही येणार४चंदपूर जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष बंदोबस्तासाठी आयटीबीपी (इंदौर तिबेटीयन बॉर्डर पोलीस) ची एक तुकडीही तैनात असणार आहे. उत्सवाच्या दहाही दिवस ही तुकडी स्थानिक पोलिसांच्या मदतीला राहणार आहे.