शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनमुळे विविध भागातील शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:31 IST

राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाकडून अभियंता पदासाठी मंगळवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र चंद्रपूर शहरातील काही परीक्षा केंद्रावरील सर्व्हर डाऊनमुळे शेकडो परीक्षार्थींना फटका बसला. अनेकांना परीक्षा देता न आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठून समजूत काढली.

ठळक मुद्देअभियंता परीक्षा : गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाकडून अभियंता पदासाठी मंगळवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र चंद्रपूर शहरातील काही परीक्षा केंद्रावरील सर्व्हर डाऊनमुळे शेकडो परीक्षार्थींना फटका बसला. अनेकांना परीक्षा देता न आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठून समजूत काढली.राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाने महाराष्ट्र नगर परिषद सेवा अंतर्गत श्रेणी अ, ब, क व ड च्या संवर्गातील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, संगणक अभियांत्रिकी सेवा, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, लेखा परीक्षण लेखा सेवा, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या सारख्या पदासाठी परीक्षेचे आयोजन केले होते. यात चंद्रपूर शहरातील गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालय व रेनायसन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या तीन ठिकाणी आॅनलाईन परीक्षेचे केंद्र देण्यात आले.मात्र गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालय येथील केंद्रावर परीक्षेचा सर्व्हर फेल असल्याने या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या तब्बल एक हजार विध्यार्थ्यांना फटका बसला. त्याच वेळेस मात्र रेनायसन्स महाविद्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे परीक्षा सुरळीत सुरु होती. या संपूर्ण प्रकारामुळे गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. या प्रकारानंतर युवासेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.पोलिसांचा चोख बंदोबस्तगेल्या ४ दिवसांपासून राज्य सरकारतर्फे महाआयटी संस्था ही परीक्षा घेत आहे. ही परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपºयातून हजारो विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर आले होते. मात्र सर्व्हर डाऊनमुळे परीक्षार्थींमध्ये प्रचंड रोष बघायला मिळाला. ही परीक्षा सकाळी ९.३० ते ११, दुपारी १२.३० ते २ व २.३० ते ५ या वेळात होती. मात्र सकाळी पहिल्या बॅचपासूनच सर्व्हरमुळे गोंधळ सुरु झाला.