शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, अन् स्वत:ही जगायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST

शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढ देण्याची घोषणा करूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने सुमारे १०० च्या जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. तर ९५ जणांचे निलंबन केले. काही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी आपल्या निर्णयावर ठामच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यापासूनचे वेतन मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून कर्मचारी कर्तव्यावर जात नसल्याने बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन बंद आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न आ वासून उभा आहे. शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढ देण्याची घोषणा करूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने सुमारे १०० च्या जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. तर ९५ जणांचे निलंबन केले. काही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी आपल्या निर्णयावर ठामच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यापासूनचे वेतन मिळाले नाही. पूर्वीच कोरोनाने आर्थिक संकट त्यातही दोन महिन्यापासून वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. दैनंदिन गरजा भागवताना मोठी कसरत होत आहे. 

पुढे काय हाेणार, काहीच कळत नाही ?

हक्काच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र शासन याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पूर्वीच तटपुंजे वेतन मिळत असल्याने काही जमा शिल्लक नाही. त्यातच दोन महिन्यापासून पगार नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरा जावे लागत आहे. -आंदोलनकर्ता

माझ्या घरी सहा जणांचे कुटुंब आहे. मंडळाकडून मिळणाऱ्या वेतनात कुटुंब चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. आता तर दोन महिन्याचा पगार झाला नाही. आता समोर कसे होणार याबाबत काहीच कळेनासे झाले आहे. -आंदोलनकर्ता

अल्प वेतनामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आम्ही मागील काही दिवसांपासून दुखवटा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला शासनाने बिन पगारी रजा केली आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून पगार मिळाला नाही. कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. -आंदोलनकर्ता

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप