शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कासवगतीची शिक्षा अजून किती दिवस?

By admin | Updated: January 10, 2015 22:51 IST

दुर्गापूर-ताडोबा मार्गावर क्रॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम दोन वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. परिणामी या मार्गावर वारंवार अपघात घडत आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध

दुर्गापूर : दुर्गापूर-ताडोबा मार्गावर क्रॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम दोन वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. परिणामी या मार्गावर वारंवार अपघात घडत आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेण्यात न आल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या रस्ता बांधकामाचे कंत्राट चंद्रपूर येथील गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. हे काम जानेवारी २०१४ पर्यंत करण्याची अट होती. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप काम अर्धवट आहे. त्यामुळे येत्या एक वर्षात हे काम होण्याची शक्यता नाही. कंत्राटदारातर्फे करण्यात येणाऱ्या कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. हा राज्य महामार्ग असून ताडोबा राष्ट्रीय उद्यानाकडे जाणार आहे. याच परिसरात कोळसा खाण असल्याने या मार्गावरून कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचे सातत्याने आवागमन सुरू असते. कंत्राटदारामार्फत एका बाजुने करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने दुसऱ्या बाजुला असलेल्या खड्डयांच्या रस्त्यातून वाहने न्यावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुचाकी वाहनांना अपघात होऊन त्यात अनेकजण जखमी झाले आहेत. १५ दिवसांपूर्वी दुर्गापूर येथील एका आयुर्वेदिक डॉक्टरचा दुचाकी अपघातात याच मार्गावर मृत्यू झाला. या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कंत्राटदार जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नितीन भटारकर यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अमोल ठाकरे, संजय ठाकूर, सुजित उपरे, मोनू गिरधर, नितीन रत्नपारखी, राहुल भगत, बिट्टू ढोरके, आशु मत्ते, संजय रायपुरे, अमित मेश्राम, पवन मेश्राम, प्रफुल्ल कुचनकर, अविनाश जेनेकर, शैलेंद्र बेलसरे, विक्की बावणे यांनी दिला आहे. (वार्ताहर)