शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाची चोरी करून घराला आग लावली

By admin | Updated: February 20, 2016 01:51 IST

ऊर्जानगरातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये चोरट्यांनी एका कुलूप बंद घरातील चार कट्टे तांदळाची चोरी करुन घराला आग लावून दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

दुर्गापूर: ऊर्जानगरातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये चोरट्यांनी एका कुलूप बंद घरातील चार कट्टे तांदळाची चोरी करुन घराला आग लावून दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यात घरमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.ऊर्जानगरमधील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये वास्तव्याला असलेले घनश्याम रिठे हे घराल कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यान, संधीसाधू इसमाने गुरुवारी रात्री कुलूप तोडून आत ठेवलेल्या सहा कट्ट्यांपैकी चार कट्टे तांदळाची चोरी केली. त्यानंतर घराला आग लावली. रात्रभर घरात आग धगधगत होती. सकाळी घराला लागलेली आग लोकांच्या निदर्शनास आली. लगेच दुर्गापूर पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करुन आग विझविली. या आगीत घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या. या कटकारस्थानामुळे घरमालकाचे लक्षावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. घनश्याम रिठे हे मोलमजुरी करुन व वेळप्रसंगी भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतात. या घटनेत अन्न, वस्त्र, निवारा जळून खाक झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रल्हाद गिरी, दुर्गापूरचे ठाणेदार आर. के. सिंगनजुडे, रामनगरचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घरातील वस्तूंची चोरी करुन नंतरही आग लावल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. (वार्ताहर)