शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांचा महामेळावा

By admin | Updated: April 28, 2016 00:46 IST

पडोली नागरिक कृतीतर्फे पडोली परिसरातील झोपडपट्टीवासीयांचा महामेळावा पडोली येथील लोकसेवा मंगल कार्यालयात...

चंद्रपूर : पडोली नागरिक कृतीतर्फे पडोली परिसरातील झोपडपट्टीवासीयांचा महामेळावा पडोली येथील लोकसेवा मंगल कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार व नागरिक कृती समितीचे अध्यक्ष किशोर पोतनवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या मेळाव्याला संबोधित करताना विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी २५-३० वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने विहीत स्वरूपात अर्ज केल्यास शासनाला पट्टे देण्याचा अधिकार आहे, अशी कायदेशीर बाजू सांगितली. राष्ट्रवादीचे हिराचंद बोरकुटे आणि शशी देशकर यांनी रेल्वे लाईन परिसरातील झोपडपट्टीवासियांनी रेल्वेच्या जागेवर आपला हक्क सांगण्याऐवजी शासनाला पर्यायी जागेची मागणी करावी, असा सल्ला दिला. प्रकाश रेड्डी यांनी लहूजी नगरच्या रहिवाशांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करण्यात यावी, अशी आग्रही भुमिका मांडली. पुरोगामी महिला समितीच्या अध्यक्ष यशोधरा पोतनवार यांनी महिलांनी आपल्या हक्कासाठी लढण्याचे आवाहन केले. मनसेच्या राजू कुकडे यांनी झोपडपट्टीवासियांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगून मनसे सर्वशक्तीनिशी लढ्यात सहभागी राहील, असे आश्वासन दिले. किशोर पोतनवार यांनीही आपले विचार मांडले. पठाण यांनी झोपडपट्टीवासियांच्या व्यथा मांडल्या. प्रास्ताविक आणि आभार माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश गावंडे यांनी मानले. पडोलीला तहसीलचा दर्जा देण्यात यावा, असा प्रस्ताव पारीत करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मितीन भागवत यांनी केले.रखरखत्या उन्हात पडोली परिसरातील इंदिरानगर, आमटा वार्ड, लहुजीनगर, गगनगिरी, खुटाळा आदी झोपडपट्टीवासीय जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. महामेळावा यशस्वी करण्यासाठी संतोष यादव, प्रकाश रेड्डी, किरण सोनी, सुरैय्या अंजुम, मंगला मेश्राम, निर्मलाबाई मारवाडे, शशिबाई विश्वकर्मा, देवकुमार विश्वकर्मा, बाबरखा पठाण, रियाजभाई, सज्जाद चाचा, इंदिराबाई मुरमाडे, निवृत्ता नंदागवळी, मंगला गावंडे, आशा गावंडे, भिमराव ठमके, सईदा शाहिदा शेख, शोभा तुपकर, वर्षा चंद्रिकापुरे, लालकन ठाकूर, रमेश जवादे, कवडू ढोके, गुलाब बोबाटे, शकीलखाँ पठाण, नागेश निखाडे, विलास शेलाटे, राजेश कुबेर आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)