शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

आशा घटेला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST

राजुरा : वेकोलिच्या पौनी ३ प्रकल्पातील सास्ती येथील प्रकल्पग्रस्त १९ वर्षीय युवती आशा तुळशीराम घटे हिने वेकोलि अधिकाऱ्याच्या मानसिक ...

राजुरा : वेकोलिच्या पौनी ३ प्रकल्पातील सास्ती येथील प्रकल्पग्रस्त १९ वर्षीय युवती आशा तुळशीराम घटे हिने वेकोलि अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलय्या यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे. येथील मूळ ओबीसी समाजाच्या या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्या आहे. परंतु न्याय मागण्याकरिता वेकोलि अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर परप्रांतीय वेकोलि अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समजून घेत नाही. त्यांना या प्रकल्पग्रस्तांशी काही देणे घेणे नसते. त्यामुळे आजवर अनेक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला दिसून येत नाही.

सास्ती येथील मृत आशा तुळशीराम घटे हिच्या वडिलांची शेती वेकोलिमार्फत संपादित करण्यात आली होती. स्व. आशा घटे ही वेकोलीमार्फत लाभार्थी असल्यामुळे नोकरी संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता वेकोलिचे योजना अधिकारी जी. पुलय्या यांनी बोलावल्यानुसार धोपटळा येथील वेकोलि कार्यालयात गेली होती. यावेळी पुलय्या यांनी आशा घटे हिला अपमानास्पद वागणूक दिली व त्यामुळे तिने सास्ती येथील घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून मृत आशा तुळशीराम घटे हिला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.

बॉक्स

वेकोलित मराठी अधिकारी द्या

येथील प्रकल्पग्रस्त अनेक पिढ्या भूमिहीन झाल्या आहे. अनेक पिढ्या उघड्यावर पडलेल्या आहे. त्यामुळे येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलि अधिकारी म्हणून मूळचे मराठी अधिकारी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.