शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सुजान समाजनिर्मितीची शिक्षकांकडूनच आशा

By admin | Updated: September 6, 2015 00:47 IST

समाज घडत असला तरी सुजान समाजनिर्मीतीची गरज आहे. या सोबतच संसरक्षम पिढी घडविण्याची गरज आहे.

सुधीर मुनगंटीवार : आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभात आवाहनचंद्रपूर : समाज घडत असला तरी सुजान समाजनिर्मीतीची गरज आहे. या सोबतच संसरक्षम पिढी घडविण्याची गरज आहे. हे काम शिक्षकच उत्तमपणे करू शकतात, त्यामुळे त्यांच्याकडून समाजाला मोठ्या आशा आहेत, असे प्रतिपादन वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा परिषद कन्नमवार सभागृहात शिक्षकदिनाचे औचित्य साधून शनिवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, चंद्रपूर पंचायत समिती सभापती बंडू माकोडे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर प्रामुख्याने उपस्थित होते.या समारंभात एकूण १५ शिक्षकांचा शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून सपत्निक गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा गुणवत्ता विकासामध्ये चिमूर तालुक्यातील कवडसी डाग प्रथम, ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगांव दुसरा तर नागभिड तालुक्यातील वासलामेंढा यांना तिसरा क्रमांक प्राप्त केल्यामुळे त्या शाळेच्या शिक्षकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपल्या पुरस्काराचे श्रेय्य आपल्या सहकाऱ्यांना देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा वसा इतरांनी घेतला पाहिले. जिल्ह्यातील शिक्षकांनी चंद्रपूर नवचेतना मिशन राज्यात आदर्श ठरण्यासाठी कार्य करावे असे आवाहन करून ते म्हणाले, इतर जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरच्या नवचेतना मिशनचे अनुकरण करायला हवेश अशा भरीव कार्याची अपेक्षा आहे. यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, सभापती देवराव भोंगळे यांचीही भाषण झाली. (जिल्हा प्रतिनिधी) यांचा झाला सत्कारअनिल मारोतराव दागमवार (जि.प. हिंदी शाळा घुग्घुस), विलास नारायण कुळमेथे (जि.प. प्रा.शाळा मुरसा), किशोर काशिनाथ नागदेवते (जि.प.प्रा.शाळा, चिखलपार), खुशाल बाजीराव मदनकर (जि.प. प्रा.शाळा, पळसगाव खु.), राजेश्वर जगन सहारे (जि.प. प्रा.शाळा जुगनाळा), सुरेश श्यामराव राऊत (जि.प.ऊ.प्रा.शाळा रत्नापूर), मनिषा सूर्यकांत धोंड (जि.प. ऊ.प्रा.शाळा चांदापूर), देवेंद्र दयाळ रायपुरे, (जि.प.ऊ.प्रा.शाळा किसाननगर), राजेश जनार्दन वाग्दरकर (जि.प. प्रा.शाळा आंबधानोरा), किशोर बालाजी भोयर (जि.प.ऊ.प्रा.शाळा चेबेरडी), बाबूराव फिलबाजी पहानटे (जि.प. प्रा.शाळा, सास्ती), सुधाकर जगन्नाथ मडावी (जि.प. प्रा.शाळा, हिरापूर), शत्रुघ्न किसन गाऊत्रे (जि.प. प्रा.शाळा, कुंभेझरी), गजानन तुकाराम चिंचोलकर (जि.प. प्रा.शाळा, गिलबिली)