शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांचे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: April 21, 2016 01:12 IST

पटवारी मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर अपूर्ण आहेत.

चंद्रपूर : पटवारी मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर अपूर्ण आहेत. त्यामुळे त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी विदर्भ पटवारी, मंडळ अधिकारी संघ, नागपूर जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच पटवरी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील तिनशेच्या जवळपास पटवारी व ५२ मंडळ अधिकारी सहभागी झाले होते.पटवारी मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी ९ ते १६ फेब्रुवारी या काळात पटवाऱ्यांतर्फे लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासन पुर्ण न झाल्यामुळे पटवारी मंडळाने १६ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण पत्र दिले. त्याचीही दखल जिल्हाधिकाऱ्यांनी न घेतल्याने ७ एप्रिलला २० एप्रिलपासून लेखणी बंद आंदोलन करण्याबाबतचे पत्र दिले. तरी सुद्धा या पत्राची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पटवारी संघटनेने बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले. यावेळी विदर्भ पटवारी मंडळाचे अध्यक्ष अरूण झाडे, सचिव संपत कन्नाके, संघटक प्रशांत सुर्वे, मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जुमडे, सचिव अनिरूद्ध पिंपळापुरे यांची उपस्थिती होती. मुख्य मार्गाने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. (नगर प्रतिनिधी)