शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक विवंचनेतून इसमाची आत्महत्या

By admin | Updated: November 30, 2015 00:55 IST

तालुक्यातील विसापूर येथील एका इसमाने घरी कोणी नसताना एका खोलीत केबल ताराने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील एका इसमाने घरी कोणी नसताना एका खोलीत केबल ताराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीला आली. मृताचे बालकदास एकनाथ बोरकर (५२) असे असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.बालकदार बोरकर बल्लारशाह प्लायवूड कंपनीत कार्यरत होते. मागील आठ वर्षापासून प्लायवूड कंपनी बंद आहे. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. अशातच ते गुजरात राज्यातील एका कंपनीत कामाला लागले होते. घरापासून व कुटुंबापासून दूर राहत असल्याने त्यांचा मानसिक तणाव वाढला होता. अलीकडेच त्यांच्या मुलीचे लग्न जुळले, त्यामुळे कमी पगारात मुलीचे लग्न कसे करणार याची चिंता सतावत होती.मागील दोन महिन्यापासून चिंतेने मनात घर केल्यामुळे व आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी कंपनीचे काम सोडून ते विसापुरात वास्तव्याला आले. आज सायंकाळच्या सुमारास मुलगा बाहेर गेला होता. पत्नी व मुलगी शेजाऱ्याकडे गेली होती. याच संधीचा फायदा घेत बालकदास यांनी घराचे दरवाजे बंद करून आतील खोलीत केबल तारेने गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. विसापूर पोलीस चौकीचे जमादार भगत यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी विसापूर पोलीस चौकीत मर्ग दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)