शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या जाण्याने हळहळले समाजमन

By admin | Updated: April 27, 2016 00:45 IST

खडसंगी येथील बसस्थानक परिसरात मागील दोन वर्षांपासून दुकानातील रिक्त जागेत आपले वास्तव्य करुन जनतेने दिलेल्या अन्नावर...

अत्याचार करून खून केल्याचा संशयखडसंगी : खडसंगी येथील बसस्थानक परिसरात मागील दोन वर्षांपासून दुकानातील रिक्त जागेत आपले वास्तव्य करुन जनतेने दिलेल्या अन्नावर आपली भूक भागविणारी तेलगू भाषिक ६० वर्षीय माधुरीच्या अचानक जाण्याने खडसंगीसह परिसरातील समाजमन हळहळले.खडसंगी येथील बसस्थानक परिसरात मागील दोन वर्षांपासून एक वेडसर महिला वास्तव्य करीत होती. खडसंगी येथील बाजार लाईन परिसरातही ती दिसायची. तिला कुठलाही आधार नसल्याने दुकानदार तथा हॉटेलमालकांनी दिलेल्या अन्नावर व चहावर ती आपली भूक भागवायची. वेडसर असली तरी ती रोज नित्याने सकाळी नळावर जाऊन आंघोळ करुन कपडेसुद्धा तिथेच धुवायची. तिच्या या कार्याने तिला स्वच्छता आवडत असावी, असे वाटायचे. या तिच्या कार्याने खडसंगी परिसरात ती सर्वांची आवडती झाली होती.मात्र अशातच वेडसर माधुरीच्या जीवनात सोमवारची सकाळ काळ ठरली. रोजच्या नित्याप्रमाणे ती समर्थ स्टिल दुकानात झोपली असता तिच्यावर अत्याचार करुन खून केल्याचा संशय परिस्थितिजन्य पुराव्यावरुन व नागरिकांंकडून वर्तविल्या जात आहे. वेडसर माधुरीवर अत्याचार करुन खून केल्याची वार्ता गावात पसरताच अख्खे गाव तिला पाहण्यासाठी घटनास्थळावर दाखल झाले. यावेळी अनेक महिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नागरिकांनी या घटनेचा निषेध करीत निराधार वेडसर महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन आरोपींना शोधून काढण्याची मागणी केली. मात्र या माधुरीच्या अचानक जाण्याने खडसंगी परिसरातील समाजमन हळहळले.पोलीस म्हणतात अत्याचार झाला नाहीचिमूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता उत्तरीय तपासणी अहवालानुसार ती भुकेने अशक्त होवून मरण पावल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.रक्ताचे डाग आले कुठून?वेडसर माधुरी जिथे झोपली होती तिथे रक्ताचे डाग आले कसे ? तिचे कपडे अस्ताव्यस्त कसे झाले व ती नग्न अवस्थेत कशी ? हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरीय आहेत. तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय जास्त बळावला आहे. या सर्व प्रकाराचा खुलासा करणे चिमूर पोलिसांपुढे आव्हान आहे. (वार्ताहर)