शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या

By admin | Updated: March 8, 2016 00:44 IST

मागील काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

कॉंग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर : मागील काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.विशेषत: चद्रपूर तालुक्यातील ताडाळी, मोरवा, साखरवाही, शेगाव, बेलसनी, वढा, सोनेगाव, उसगाव, पांढरकवडा, धानोरा पिपरी, वेंढली, मारडा, सिदूर, चारगाव, देवाडा आदी गावांमधील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या अकाली आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसला असल्याने शेतकऱ्यांचे ऐन हाती येणारे पीकही गेले. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या भागाचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा मागणीचे निवेदन चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे शहर सचिव महेश मेंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषीमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मार्फतीने पाठविले आहे. चंद्रपूर तालुक्यात जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाते. पावसाळ्यात होणाऱ्या खरीप पीकांनाही यावर्षी फटका बसला. अगोदरच कर्जबाजारी असलेला शेतकरी कसाबसा रब्बी पीक घेण्याच्या तयारीत असताना पुन्हा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतात आलेले पीक पावसाने हिरावले तर डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या मदतीची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन महेश मेंढे यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांना देण्यात आले. शिष्टमंडळात किसान खेत मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोखारे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे महेश मेंढे, प्रभाकर ताजने, चंद्रपूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष नागेश बोंडे, घुग्घुस ग्रामपंचायतीचे सदस्य पवन आगदारी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे रोशन रामटेके, बबलु सातपुते, सचिन कत्याल, सचिन रणवीर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)