शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लक्कडकोट परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: September 11, 2015 01:16 IST

राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोटा, कोस्टाळा, आनंदगुडा परिसरात एक महिन्यापासून मलेरिया, डेंग्यूसदृष्य तापाची साथ सुरू आहे.

राजुरा : राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोटा, कोस्टाळा, आनंदगुडा परिसरात एक महिन्यापासून मलेरिया, डेंग्यूसदृष्य तापाची साथ सुरू आहे. मात्र रुग्णांना आरोग्य सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे आनंदगुडा येथील एका महिलेचा मृत्यू झाला व आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे आदिवासी व इतर शेकडो रुग्ण तापाच्या साथीने घरीच फणफणत आहे.लक्कडकोट, घोटा, कोस्टाळा, आनंदगुडा हा परिसरात मलेरियाग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्यामुळे नेहमीच आजाराचे प्रमाण जास्त आहे. सदर गावे देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात येतो. परंतु तेथेसुद्धा एकच वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे येथील रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत. लक्कडकोट येथे आरोग्य उपकेंद्र आहे. तेथे एकच परिचारिका असून तिच्याकडे सहा गावांचा प्र्रभार आहे. त्यामुळे आजारी लोकांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. बुधवारी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेली आनंदगुडा येथील महिला सुनिता रमेश कुळसंगे (३०) हिचा मृत्यू झाला. यापूर्वी घोटा येथील एका मुलीचा मृत्यू झाला होता. काही जागृत नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांना रुग्णांची संख्या वाढत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर घोटा येथील गंभीर आजारी भंगू भिमू कुमरे, सुरेश कुमरे, भागिरथा कुमाटे यांना तातडीने चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राजुरा ग्रामीण रुग्णालयात १० रुग्ण भरती आहे. तर शेख अयुब अनिल कोटावार व अन्य काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.लक्कडकोट परिसरात आदिवासीची संख्या जास्त आहे. त्याची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे राजुरा, चंद्रपूर येथे जावून उपचार घेवू शकत नाही. त्यामुळे शेकडो रुग्ण घरीच ताफाने फणफणत आहे. हिच स्थिती कायम राहिल्यास आरोग्याची स्थिती बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लक्कडकोट येथे आरोग्य शिबिर लावण्यात यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)