शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली

By admin | Updated: July 4, 2015 01:44 IST

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ग्रामीण भागात १५ ते २० वर्षांपासून अत्यल्प मानधनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारण नसताना कामावरून काढण्यात आले.

आहार शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे उपोषण ब्रह्मपुरी : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ग्रामीण भागात १५ ते २० वर्षांपासून अत्यल्प मानधनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारण नसताना कामावरून काढण्यात आले. याविरोधात कर्मचाऱ्यांनी येथील पंचायत समितीसमोर तीन दिवसांपुर्वी उपोषण सुरू केले. मात्र अद्यापही प्रशासनाने दखल न घेतल्याने शुक्रवारी उपोषणकर्त्या एका महिलेची प्रकृती खालावली असून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुलभा तोंडरे, विद्या मैद, रविंद्र मैंद जि.प. शाळा बरडी तुन्ही, वासुदेव आदे जि.प. शाळा वायगाव, मीना मेश्राम, सेमु जराते जि.प. शाळा गोगाव, बिहारी हुमने वैनगंगा विद्यालय कोलारी या स्वयंपाकी व मदतनिस म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररित्या कामावरून कमी करण्यात आले. कामावर घेण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या मुख्याध्यापक तसेच व्यवस्थापन समितीवर कारवाई करण्याकरिता आयटकचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, पुरुषोत्तम ढोरे, कुंदा कोहपरे यांच्या नेतृत्वात १ जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. सुलभा तोंडरे, विद्या मैंद, रवींद्र मैंद, वासुदेव आदे, मीना मेश्राम, सेमू जराते, बिहारी हुमने यांच्यापैकी सुलभा तोंडरे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)