शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:25 IST

बल्लारपूर तालुक्यात विसारपूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १५ हजारावर आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हास्तरावर अधिकाऱ्याचा प्रभार सोपविला.

ठळक मुद्देविसापूर आरोग्य केंद्रातील प्रकार : रुग्णाच्या तुलनेत डॉक्टरची कमतरता

अनेकश्वर मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात विसारपूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १५ हजारावर आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हास्तरावर अधिकाऱ्याचा प्रभार सोपविला. दरम्यान कंत्राटी पद्धतीने एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची येथे नेमणूक करण्यात आली. त्यांच्या करार संपुष्टात आल्याने विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार आता एकाच वैद्यकीय अधिकाºयावर आला आहे. यामुळे येथे रुग्णाच्या तुलनेत डॉक्टरची कमतरता भासत आहे.विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत नांदगाव (पोडे), शिवणी व चुनाभट्टी उपकेंद्राचा समावेश आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनील कुकडपवार यांना जिल्हा स्तरावर हिवताप अधिकारी म्हणून वर्षभरापासून पदभार सोपविण्यात आला. दरम्यान डॉ. सुकेशनी कांबळे यांची अकरा महिन्यासाठी येथील आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ नुकताच संपला. परिणामी सर्व आरोग्य केंद्राचा भार येथील डॉ. अश्विनी बेले यांच्यावर आला. येथील आरोग्य केंद्रात बाह्यरुग्णांची संख्या दररोज १५०-२०० च्या आसपास असल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी आल्याने गावकºयात संताप व्यक्त केला जात आहे. येथील आरोग्य केंद्राची इमारत अद्यावत व सर्व सुविधायुक्त झाल्याने गरीब व गरजू रुग्णांचा उपचारासाठी ओढा वाढला आहे. महिलांना प्रसुतीगृहाची सुविधा झाल्यामुळे प्रसुतीसाठी महिला येतात. अशातच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान नसल्यामुळे मुख्यालयी राहणे अडचणीचे ठरले आहे. रुग्णांना प्रथमोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जि. प. आरोग्य प्रशासनाने येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेवून दोन वैद्यकीय अधिकारी नियमीत सेवा देण्यासाठी नियुक्त करणे क्रमप्राप्त झाले आहे.विसापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनील कुकडपवार यांच्यावर जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून तात्पुरता प्रभार जिल्हा आरोग्य प्रशासनाने सोपविला आहे. यामुळे आजघडीला डॉ. अश्विनी बेले यांनाच आरोग्य केंद्राचा भार पेलावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्यास नियमीत दोन वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या सेवेत रुजू होतील.- डॉ. प्रकाश नगराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी बल्लारपूरविसापूर आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्याने दोन वैद्यकीय अधिकारी नियमीत सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरतात. येथे रुग्णांची हेळसांड होवू नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. आरोग्य विभाग सकारात्मक निर्णय लवकरच घेणार.- गोविंदा पोडे, सभापती, पंचायत समिती, बल्लारपूर