शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोघांची प्रकृती खालावली

By admin | Updated: February 4, 2017 00:34 IST

घुग्घुस येथील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांत संताप : उपोषण चिघळत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्षचचंद्रपूर : घुग्घुस येथील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी आठव्या दिवशीही आंदोलन सुरू होते. दरम्यान, गुरुवारी पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी आणखी दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही रुग्णालयात हलविले आहे. एकापाठोपाठ एक उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही कंपनी व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन मूग गिळून बसले आहेत. अशा निगरगट्ट व्यवस्थापन व प्रशासनामुळे संताप व्यक्त केला जात आहे. काल गुरुवारी बंडू चटकी, प्रविण भगत, सुरेश जेनेकर, रवींद्र गोहोकार व अमोल बोढाले अशी या उपोषणकर्त्यांची नावे आहेत. येथील गुप्ता एनर्जी प्रकल्पाला कृषी योग्य उपजाऊ जमीन दिल्या. पिढीजात शेती व्यवसाय गेला. कारखान्यात नोकरी मिळाली असती तरी गेल्या तीन वर्षांपासून कारखाना बंद पडला आहे. प्रकल्पग्रस्तांना काम नाही, केलेल्या कामाचे तीन महिने वेतन नाही. त्यांचे व कुटुंबायाचे भविष्यत अंधारात आहे. न्याय मिळावा म्हणून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी एकाची प्रकृती हालवली आणि दवाखान्यात दाखल केले. मात्र शासन प्रशासन, लोक प्रतिनिधीकडून दखल घेतली गेली नसल्याने प्रकल्पग्रस्तामध्ये तीव्र असंतोष फोफावला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविंद्र गोहोकार या उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली होती आणि दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान उपोषणाला बसलेल्या शेणगाव येथील बंडू चटकी याच्या आईने मुलाच्या भविष्याच्या चिंतेत व्यथित होऊन घरी खाणेपिणे सोडले. त्यामुळे प्रकृती बिघडली तर अमर शेंडे या आंदोलनकर्त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली आहे.त्याला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. (शहर प्रतिनिधी)