शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाकडून जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: July 10, 2015 01:32 IST

कुंभेझरी येथील अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष जयाबाई नरसिंग नामवाड शाळेत गेल्या असता मुख्याध्यापक दीपक तेलंग यांनी शिविगाळ करुन धक्काबुकी केली .

कुंभेझरीतील प्रकार : गुन्हा दाखलगडचांदूर: कुंभेझरी येथील अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष जयाबाई नरसिंग नामवाड शाळेत गेल्या असता मुख्याध्यापक दीपक तेलंग यांनी शिविगाळ करुन धक्काबुकी केली व शाळेबाहेर काढले. जिवे मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार जयाबाई नामवाड यांनी जिवती पोलिसात दिली. जिवती पोलिसांनी मुख्याध्यापक दीपक तेलंग, संचालक संतोष मातेवाड, संदीप कोचवाड सर्व रा. कुंभेझरी यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.कै. अण्णाभऊ साठे शिक्षण संस्था कुंभेझरीेचा वाद धर्मदायआयुक्त कार्यालयात सुरु आहे. अण्णाभाऊ साठे विद्यालय कुंभेझरी येथे संस्थेच्या कोषाध्यक्षा जयाबाई नामवाड नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या असता मुख्याध्यापक दीपक तेलंग यांनी शाळेत येण्यास मज्जाव केला व अश्लिल भाषेचा वापर करीत शिविगाळ करुन धक्काबुक्की करुन अपमानीत केले व जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संस्थेचे संचालक संतोष मोतेवाड, संदीप कोचवाड मुख्याध्यापकांना सहकार्य करीत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांच्याकडे दिले असून गैरअर्जदार संतोष नामवाड, सुग्रीव गोतावळे, संदीप कोचवाड, दीपक तेलंग यांच्यापासून आपल्या कुटुंबास धोका असल्याचे म्हटले आहे. (वार्ताहर)