शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कमालीची दफ्तर दिरंगाई

By admin | Updated: July 20, 2015 00:48 IST

कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालयी स्थायिक नसून इतर ...

दैनंदिन कामकाजावर परिणाम : वरिष्ठांना माहीत असूनही कारवाई शून्यकोरपना : कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालयी स्थायिक नसून इतर तालुक्यातून रोज ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांपासून सर्वच क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश दिसून येतो.सहाव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा मोठ्या पगाराची मिळकत होत असल्याने त्यांचे राहणीमान निश्चितच उंचावले आहे. ही बहुतेक मंडळी आपली कुटुंबे पॉश शहरात वास्तव्यास ठेऊन दुचाकी वाहनाने ३० ते ४० कि.मी. अंतरावरील आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात.र्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येते. यात शिक्षक वर्ग आघाडीवर असून कोरपना व परिसरातील गावात नोकरीवर असणारे शिक्षक थेट वणी जि. यवतमाळ, राजुरा व गडचांदूर येथून ये-जा करणारे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना शासन घरभाडे भत्ता देत असते. मात्र या भत्त्यास सदर कर्मचारी खरोखरच योग्य आहे काय, याची शहानिशा करणे येथील वरिष्ठ अधिकारी महत्त्वाचे समजत नाही. किंबहुना, कोरपननाचे वरिष्ठ अधिकारी स्वत:च मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा हा प्रकार सुरू आहे.दरम्यान, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने त्यांच्या कामातील दिरंगाई वाढत आहे. ही बाबसुद्धा वरिष्ठ अधिकारी दुर्लक्षित करीत आहेत.कोरपना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तर चक्क एक चार चाकी वाहनच भाड्याने घेतल्याचे समजते. ही सर्व मंडळी राजुरा ते कोरपना असा सुमारे ४५ किमीचा रोज प्रवास करीत असतात. मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही त्यांना नियमित घरभाडे भत्ता अदा होत असल्याची माहिती आहे. हे सारे येथील तहसिलदारांना माहित असूनही त्यांना घरभाडे मिळते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.तलाठीसारख्या महत्त्वाच्या पदावर असणारे कर्मचारीसुद्धा बाहेर गावाहून ये-जा करतात. तलाठी महोदय कधी घरून निघालेले असतात. मात्र कार्यालयात पोहचलेले नसतात. दुसरीकडे कार्यालयातून आताच बाहेर गेल्याचे सहकारी सांगतात.अशा वेळी गरजवंतांना सतत हेलपाटे खावे लागतात. या हेलपाट्याव्यतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून द्यावी लागणारी ‘दक्षिणा’ ती वेगळीच. अर्थात् याला येथील काही तलाठी अपवादही आहेत. मात्र त्यांची संख्या नगण्य दिसते. (तालुका प्रतिनिधी)