शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

रोजगार सांभाळत तो करतो पक्ष्यांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

राजू गेडाम मूल : निसर्गातील वाढणारे प्रदूषण व त्यामुळे पशुपक्ष्यांचे धोक्यात येणारे अस्तित्व कायम राहावे, जेणेकरून निसर्गाची ...

राजू गेडाम

मूल : निसर्गातील वाढणारे प्रदूषण व त्यामुळे पशुपक्ष्यांचे धोक्यात येणारे अस्तित्व कायम राहावे, जेणेकरून निसर्गाची साखळी कायम राहील, हे हेरून आपला व्यवसाय बघत पशुपक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी राहुल धडपडताना दिसत आहे. त्यांनी गेल्या सहा वर्षांपासून पशु संवर्धनाचा जणू विडाच उचलला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्याला सन्मानित करण्यात आले आहे.

मूल- गडचिरोली महामार्गावर राहुलचा पानठेला व चहाचे दुकान आहे. या व्यवसायात काम करता करता सभोवताली असलेल्या झाडांवर येणारे पक्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकताना दिसले. त्यांनी पाण्यासाठी झाडाला घागरी बांधल्या. पाण्याच्या घागरी दिसताच पक्षी तिथे येऊ लागले. त्यानंतर राहुलचा तो नित्यक्रमच झाला. आजही अनेक पक्षी तिथे येऊन आपली तृष्णा भागवित असल्याचे दिसून येते. सन २०१० पासून सुरू केलेला हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. वृक्षप्रेमी फाऊंडेशन, सत्कार्य फाऊंडेशन, स्पॅरोताई फाऊंडेशन व अग्रणी पाणी फाऊंडेशनच्यावतीने त्याला पुरस्कृत करण्यात आले आहे.