शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी साजरा केला कालवडीचा नामकरण सोहळा

By admin | Updated: July 7, 2015 01:04 IST

भूतदया ही संकल्पनाच मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे करते. प्राणीमात्रांवर दया करा.

घोडपेठ: भूतदया ही संकल्पनाच मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे करते. प्राणीमात्रांवर दया करा. त्यांना प्रेम द्या हा संदेश देणाऱ्या कितीतरी प्राणीमित्र संघटना आज देशभरात कार्यरत आहेत. मात्र घोडपेठ येथील रामदास कुळमेथे यांनी आपल्या एक महिन्याच्या वासराचा नामकरण सोहळा साजरा करुन भूतदयेचा अभुतपूर्व परिचय दिल्याने परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.रामदास कुळमेथे यांची घोडपेठ येथे तीन एकर शेती आहे. सध्या त्यांच्याकडे दुधाच्या तीन गायी तसेच तीन जर्सी कालवडी आहेत. स्वत:जवळ असलेल्या पशुधनाला ते पोटच्या गोळ्याप्रमाणे वागवतात. त्यांची नित्यनेमाने सेवा करतात. आज माणूसकी हरवत चाललेली आहे. मात्र भूतदया आणि प्रेम कुठेतरी जिवंत असल्याचा परिचय रामदास कुळमेथे यांनी त्यांच्या वागणूकीतून दिला आहे. घोडपेठ येथील पशुधन अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांच्या मार्गदर्शनात जर्सी गायीचे संकरीकरण करण्यात आले. महिनाभरापूर्वी रामदास कुळमेथे यांच्या घरात वासराने जन्म घेतला. त्या वासराचा थाटामाटात नामकरण सोहळा साजरा करुन त्याला गौरी हे नाव देण्यात आले. (वार्ताहर)जिवंत व्यक्तीचे सर्व सोपस्कार विधीवत पार पाडले जातात. मात्र मुक्या जनावरांची संवेदना लक्षात घेऊन रामदास कुळमेथे यांनी वासराचा नामकरण सोहळा साजरा करुन प्राणी प्रेमाचा अभूतपूर्व संदेश दिला आहे.- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, पशुधन अधिकारी, घोडपेठ