शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

फाटलेले आयुष्य शिवण्याचे साहस ठेवा

By admin | Updated: December 27, 2014 22:49 IST

फुलांची मला भीती वाटते कारण काट्यांची आदत झाली ना ! सारे झरे सुखाचे आईत आटलेले. शिवता मलाही आले आयुष्य फाटलेले. जीवनात अनेक संकटे येतात पण संकटावर मात करुन उभे राहायला शिका,

सिंधुताई सपकाळ : संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने ‘आईच्या काळजातून’ चे आयोजनराजुरा : फुलांची मला भीती वाटते कारण काट्यांची आदत झाली ना ! सारे झरे सुखाचे आईत आटलेले. शिवता मलाही आले आयुष्य फाटलेले. जीवनात अनेक संकटे येतात पण संकटावर मात करुन उभे राहायला शिका, संकटाची उंची आपोआप कमी होईल. फुलांच्या पायघड्यांवरुन चालताना काटे बोचले तरी सहन करायला शिका, काट्याला फक्त बोचनं माहिती आहे, वेदना कळत नसतात. तुम्ही पायच एवढे घट्ट करा कीस एक दिवस काटेच म्हणतील ‘हम झुकते है तुम चलना शिको’ असे मनोगत समाजसेविका सिंधूताई सपकाळे यांनी येथे व्यक्त केले. संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित ‘आईच्या काळजातून’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सिंधूताई पुढे म्हणाल्या, संसारात पती पत्नीचे महत्त्व सारखेच आहे. संसाराचा गाडा हाकताना आईवर जास्त जबाबदारी असते. त्यामुळेच तिला माऊली म्हणतात. बाप मेला तर मरत नाही. पण आई मेली तर बाप कोळसतो. आणि एक लक्षात ठेवा पित्याचे छत्र हररपलेल्या घरात कोणीही दगड मारतात. त्यामुळे आई मांगल्याचे प्रतिक, तर बाप घराचे अस्तित्व आहे.नव्या पिढीला संदेश देताना त्या म्हणाल्या, आज जे देशात घडत आहे. त्याला माणूसच नाही तर बाईसुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे मुलींनीसुद्धा आपल्याला चौकट लावायला हवी. दिसणं महत्त्वाचे नाही असणं महत्त्वाच आहे. तुमच्याकडे बघताना दुसऱ्याला मादी वाटायला नको, माय वाटायला हवी! पती पत्नीने एकमेकांना समजून घेणे यालाच बांधिलकी म्हणतात. ती जपलीच पाहिजे. कारण सात टप्यात जपलेली आपली संस्कृती आहे तिला उघडे करुन नका.मुलांनो शिक्षण घेताना विचार करा, शिक्षण म्हणजे स्वत:ची पातळी सोडणे, हम करे सो कायदा नाही. शिक्षण आस्वादाची चव कळू देते, सोशितांना शिकविते, दुबळ्यांना आधार देते. शिक्षण म्हणजे नम्र होणं. मुलांच्या शिक्षणासाठी आई वडील राबराब राबतो कपडे पुस्तके देतो. मोबाईलही देतो त्यांच्याकडे एकदा बघा, शर्ट फाटलेले असतात. चपला तुटलेल्या असतात. मुलं शिकावी म्हणून आई चार घास कमी खाते. उपाशी राहतेस याची जाणीव नव्या पिढीनं ठेवली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक लता ठाकरे यांनी केले. मानपत्र वाचन नगरसेविका माया रोगे यांनी केले. संचालन सुधीर झाडे यांनी तर आभार बापुराव मडावी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)