शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मनपात नोकरी लावून देण्याची बतावणी करून बेरोजगारांना टोपी

By admin | Updated: March 6, 2016 00:38 IST

येथील महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना टोपी घालणाऱ्या ठगसेनास शहर पोलिसांनी अटक केली आहे.

एकाला अटक : आयुक्तांनी केली पोलीस ठाण्यात तक्रारचंद्रपूर : येथील महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना टोपी घालणाऱ्या ठगसेनास शहर पोलिसांनी अटक केली आहे. यात आणखी काही जण गुंतल्याची शक्यता असल्याच्या संशयावरून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. महानगरपालिकेत क्लर्क आणि चपराशीपदासाठी नोकरभरती सुरू असल्याचे सांगत या पदावर भरती करण्यासाठी युवकांकडून पैसे घेऊन बनावट नियुक्तीपत्र देणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन शेख यांना मिळाली. काही युवक त्यांच्याकडे आले. त्यांनी हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेत चौकशी केली. परंतु अशी कोणतीही भरती प्रक्रिया महानगरपालिकेत सुरू नसल्याची माहिती त्यांना महानगरपालिकेतून मिळाली. लगेच ताजुद्दीन शेख यांनी महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला. या प्रकाराने आयुक्तसुद्धा अचंबित झाले. त्यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच तक्रारीची दखल घेत तिघांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील दोघे हे या ठगसेनाकडे पैसे परत मागण्यासाठी आले होते, असे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या युवकाकडे बनावट नियुक्तीपत्राचे काही दस्ताऐवज आढळले असून त्यातील मजकूर किंवा भरती प्रक्रिया यासंबंधी महानगरपालिकेचा कोणताही संबंध नसल्याचे आयुक्तांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती त्यांनी या तक्रारीतून केली होती. काही पीडित युवकांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पीडित युवकांच्या तक्रारीवरुन तीन संशयितांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपी भानापेठ येथील असून त्याची स्वत:ची प्रिटिंग प्रेस असल्याचे सांगण्यात येते. मनपात आपली सेटिंग असून नोकरीची खात्री पक्की, असे आश्वासन देऊन तो युवकांना गळाला लावत होता. क्लर्क पदासाठी तीन लाख तर चपराशीपदासाठी दोन लाख रुपये ही टोळी घेत होती. मात्र आतापर्यंत त्यांनी किती युवकांकडून पैसे घेतले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)दारु तस्कराला पकडलेचौगान : बेटाळा फाटा ते चौगान मार्गाने सायकलने दारूची तस्करी करणाऱ्या प्रभाकर तुळशीराम भोयर (रा. चौगान) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून देशी दारूच्या २० बॉटल जप्त करण्यात आल्यात. चौगान येथील पोलीस पाटील किशोर तिडके, पोलीस मित्र धनपाल बुरांडे, विनोद बुराडे, शरद मैद यांनी दारु पकडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. ही कारवाई ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लक्ष्मण मडावी यांनी केली. (वार्ताहर)