शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

मूल तालुक्यात हस्तलिखीत दाखल्याचेच वाटप

By admin | Updated: December 30, 2014 23:32 IST

महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१३ पासून सर्व हस्तलिखीत दाखले बंद करुन संगणकीकृत दाखले देण्याचा निर्णय घेतला. १२ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात संगणक परिचालकांचे कामबंद

मूल : महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१३ पासून सर्व हस्तलिखीत दाखले बंद करुन संगणकीकृत दाखले देण्याचा निर्णय घेतला. १२ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात संगणक परिचालकांचे कामबंद असल्याने सरपंच व ग्रामसेवक हस्तलिखीत दाखले, प्रमाणपत्रे देत असल्याचे उघडकीस आले आहे. ही शासन निर्णयाची पायमल्ली असून जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. भारत निर्माण कायक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेला ई- पंचायत या मिशन मोड प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व पंचायत राज संस्थाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. राज्यात हा प्रकल्प संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) या नावाने राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये संग्राम ग्रामसेवा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या संग्राम केंद्रातून शासनस्तरावरील अहवाल, संदर्भ सेवा, शासन ते नागरिकांना घ्यावयाच्या सेवा व सुविधा संग्राम केंद्रातून देण्याचे नियोजित आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय, खासगी, सामाजिक सेवा जास्तीत जास्त पारदर्शक व एकात्मिक पद्धतीने संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच नजिकच्या काळात उपलब्ध करून देणे, हा या ग्रामसेवा संग्राम केंद्राचा उद्देश आहे. सध्या या संग्राम केंद्रातून पंचायत राज संस्थाकडून नागरिकांना देण्यात येणारे सर्व प्रकारचे दाखल, प्रमाणपत्र संगणकाच्या माध्यमातून द्यावयाचे आहे. १ एप्रिल २०१३ पासून पंचायत राज संस्थाकडून या शासन निर्णयाचा परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केलेले प्रमाणपत्र, दाखले हस्तलिखीत तसेच छापील स्वरुपात पुर्णत: बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सदर दाखले हे फक्त संगणकीकृत स्वरुपातच देण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या सर्व सेवा नागरिकांना त्वरित उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ग्राम पातळीवर ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांची राहील. याबाबत दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्यास शिस्तभंगाच्या कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.शासन निर्णयाप्रमाणे संगणकीकृत माध्यमानेच दाखले वितरीत होत आहे. याची संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी वेळोवेळी तपासणी करुन खातरजमा करावी व या शासन निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे जबाबदार असून त्याबाबतीत त्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन हा प्रकल्प यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही शासन नियमांची पायमल्ली केली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)