किराणा व्यापारी असोसिएशनतर्फे १५ बेड्स :नगराध्यक्षांच्या आवाहनास प्रतिसाद
भद्रावती : महामारीच्या काळात नागरिकांनी भरभरून मदत करावी या नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी क्लब भद्रावतीतर्फे जैन मंदिर येथील कोविड सेंटरला आज पाच हजार हॅन्ड ग्लोव्हज व दहा ऑक्सिजन फ्लोमीटरची मदत करण्यात आली.
तसेच भद्रावती किराणा व्यापारी असोसिएशनतर्फे श्री मंगल कार्यालय स्थित सेंटरला १५ बेड्स उपलब्ध करून देण्यात आले.
या कार्यात रोटरी क्लब भद्रावती व व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिंग व डॉ. नितीन सातभाई, भाग्यश्री उमाटे यांच्याकडे सदर साहित्य सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब भद्रावतीचे अध्यक्ष विनोद कामडी, सचिव प्रवीण महाजन, डिस्ट्रिक्ट रिजनल चेअरमन भाविक तेलंग, सदस्य नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रकाश पिंपळकर, हनुमान घोटेकर, अब्बास अली, सलीम शेख, बांदुरकर तसेच किराणा असोसिएशनतर्फे संतोष आमने, नीलेश गुंडावार, अविनाश सिध्दमशेट्टीवार व अन्य सदस्य उपस्थित होते.