शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनो, आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जा!

By admin | Updated: March 8, 2016 00:50 IST

मुलगी वयात येताच तिच्यात मानसिक व शारिरीक बदलाची प्रक्रिया सुरु होते. त्यांच्यात आकर्षण वाढते.

किशोरींचे प्रशिक्षण : अश्विनी बेले यांचे मार्गदर्शनबल्लारपूर : मुलगी वयात येताच तिच्यात मानसिक व शारिरीक बदलाची प्रक्रिया सुरु होते. त्यांच्यात आकर्षण वाढते. मनाची घालमेल होते. अशावेळी पालकांनी समजुतदारपणा दाखविणे गरजेचे आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासाचे साधन शिक्षण आहे. मुलींनोे आत्मविश्वासाने व निर्भयपणे जीवनाला सामोरे जाण्याची मानसिकता बाळगा, असे मार्गदर्शन विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी बेले यांनी सोमवारी किशोर मुलींच्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने विसापूर येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात किशोरी मुलींचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. शिबिराचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच रिता जिलटे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुनील रोंगे, सहाय्यक गटविकास अधिकारी संध्या दिकोंडवार, प्रकल्प अधिकारी वंदना दुधाने, आरती जगताप, कल्पना देवगडे, मार्गदर्शक अ‍ॅड. जावेद शेख, डॉ. अश्विनी बेले, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुरेखा कोडापे, सरिता झाडे, नंदा शेंडे, मंजुळा कन्नाके, उज्ज्वला कोडापे, नीता वनकर, शशिकला खिरटकर, रेखा ढेंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी कुटुंब नियोजन व लैंगिक प्रशिक्षण यावर डॉ. अश्विनी बेले, कौटुंबिक हिंसाचार व कायदेविषयक बाबी यावर अ‍ॅड. जावेद शेख, विकासात महिलांचे योगदान यावर संध्या दिकोंडवार तर विविध योजनाची माहिती कल्पा देवगडे यांनी दिली. प्रास्ताविकातून शशिकला खिरटकर यांनी मार्गदर्शन शिबिरांची भूमिका मांडली. संचालन रेखा ढेंगळे यांनी तर आभार शालिनी नांदे यांनी मानले. यावेळी शालेय विद्यार्थिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)