शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडून गुरुजी वेगळ्यात कामात

By admin | Updated: August 1, 2014 00:13 IST

अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. कार्यरत शिक्षकांनी गावातील सुशिक्षितांकडे शाळांचा ‘चार्ज’ दिला असून ते पॉलिसी, फ्लॅटसह अन्य कामात गुंतले

प्रशासनाचे दुर्लक्ष : ज्ञानदानासोबत शेतीचा जोडधंदाचंद्रपूर : अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. कार्यरत शिक्षकांनी गावातील सुशिक्षितांकडे शाळांचा ‘चार्ज’ दिला असून ते पॉलिसी, फ्लॅटसह अन्य कामात गुंतले असल्याचे चित्र आहे. अनेक शिक्षक सध्या शेतीच्या कामातही व्यस्त आहेत. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांशी साटेलोटे असल्याने दुर्गम भागातील शिक्षकांचे चांगलेच फावत आहे. जिवती, पोंभूर्णा, चिमूर, कोरपना, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीडसह अन्य तालुका मुख्यालयापासून बऱ्याच अंतरावर आहे. या तालुक्यांतीलच दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. जिल्हा परिषदेचे तर सोडाच पंचायत समित्यांचे शिक्षण विभागाचे अधिकारी कधी जात नाही. हीच संधी साधून मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत अन्य कर्मचारीही शाळेला बुट्टी मारतात. आता तर यापुढे जावून काही शिक्षक, मुख्याध्यापकांनी आपापली दुकाने सुरू केली आहेत.शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकासह अन्य कर्मचारी पॉलिसी, फ्लॅट, शेतीविक्रीच्या कामात लागले आहेत. शाळेची दैनंदिन कामे व्यवसायात आड असल्याने त्यावर या कर्मचाऱ्यांनी तोडगा काढला आहे. गावातीलच डीएड, बीएड झालेल्या तरुणांना या शिक्षकांनी आपल्या शाळेवर महिन्यावारीने रुजू करवून घेतले जाते. त्यांना तीन- चार हजार रुपये मानधनही दिले जाते. या मानधनातून त्यांचा शिकविण्याचा सराव होत असून पैसेही मिळत आहेत.काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेतील एका विभागाच्या पथकाने दुर्गम भागातील एका शाळेला भेट दिली. तेव्हा शाळेत खरा शिक्षक सोडून दुसराच कर्मचारी दिसला. त्याला विचारणा केली असता त्याने आपण खरे शिक्षक नसल्याचे सांगून आपण मानधनावर शिकवत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर परिसरातील अनेक जिल्हा परिषद शाळांत असेच प्रकार सुरू असल्याचेही त्या युवकाने सांगितले. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची साखळीच असल्याने असे प्रकार दुर्गम भागात सरार्सपणे सुरू आहेत. (शहर प्रतिनिधी)