शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामुळे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला

By admin | Updated: October 28, 2015 01:09 IST

महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निवडणुकीत भाजपाने दिले होते.

अशोक चव्हाण यांचा आरोप : चिमुरात प्रचार सभाखडसंगी : महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निवडणुकीत भाजपाने दिले होते. राज्याचे मुख्यमंत्री आठ वेळा विदेशवारी करुन आलेत. मात्र युवकांना रोजगार देणे तर दुरच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी चिमूर येथील प्रचार सभेत केला. चिमूर येथील शेतकरी भवनात मंगळवारी नगर परिषद निवडणूक प्रचारानिमित्त आयोजित सभेला प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अनिलराव धारट, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, माजी अध्यक्ष तथा गटनेता डॉ. सतीश वारजूरकर, पंजाबराव गावंडे, संजय डोंगरे, राजू पाटील झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.खासदार अशोक चव्हाण पुढे म्हणाले, गरीबाला महागाईमुळे तुर डाळ चाखणे दुर्मिळ झाले आहे. गरीबाला अन्न मिळत नाही. सध्याचे सत्ताधारी देशाला जाती- जातीत विभागण्याचे काम करीत आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले याच्या विचारामुळे देश आजही एकसंघ व सुरक्षित आहे. सर्वसामान्य मतदारांनी १५ लाख मिळणार म्हणून भाजपाला मतदार केले. मात्र १५ पैसेही मिळाले नाही. त्यामुळे भाजपाने सर्व सामान्यांना फसविले आहे. तेव्हा त्यांना जॉब विचारण्याकरीता नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करुन नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे आवाहन खासदार चव्हाण यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळग्रस्त नाही. त्यामुळे सर्वच खावून सुखी आहेत काय, सर्वानाच चांगले पीक आले काय, असा प्रश्न उपस्थित करीत विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर तोप डागली. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. धानाला भाव तीन हजार वरुन १७०० रुपये झाले. त्यामुळे येत्या एक तारखेच्या निर्णयावर शेतकऱ्याचं भविष्य ठरणार असल्याचे आमदार वडेट्टीवार म्हणाले. याप्रसंगी पक्षाचे सर्वच १७ उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश वारजूरकर यांनी केले. संचालन सुधीर पोहणकर तर आभार राजू देवतळे यांनी मानले. यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)