शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गुढी पाडव्याच्या रॅलीने वरोरा शहर दुमदुमले

By admin | Updated: March 29, 2017 02:00 IST

मराठी नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी वरोरा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ढोल-ताशांचा गजर : आदिवासींच्या नृत्याने लक्ष वेधले वरोरा : मराठी नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी वरोरा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये वरोरा शहरवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमधील मनमोहक दृश्य बघण्यास रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी उसळली होती. गुढी पाडवा अशा आगळ्यावेगळ्या स्वरुपात साजरा करण्याकरिता महात्मा गांधी उद्यान योग मंडळाने पुढाकार घेतला. यामध्ये वरोरा शहरवासीय मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवितात. आज सकाळी महिलांच्या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकी रॅलीमध्ये काही महिला बुलेट दुचाकी घेऊन सहभागी झाल्या होत्या. दुचाकी रॅलीची समाप्ती झाल्यानंतर वरोरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यात यावर्षी प्रथमच कल्पतरु सोशल मंडळ वरोराने आपले बँड पथक तयार करुन रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीमध्ये चंद्रपूर येथील मल्लखांब प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. चिमूरचे आदिवासी नृत्य, यवतमाळचे ढोल पथक, सातऱ्याचा दांडपट्टा, वरोऱ्याचे लेझीम पथक, महिला भजन मंडळे सहभागी झाले होते. रॅलीत मल्लखांब ढोल पथक, दांड पट्टा, आदिवासी नृत्य सर्वांंचे लक्ष वेधून घेत होते. रॅलीमधील सहभागी असलेल्या पथकाच्या सदस्यांना वरोरा शहरातील सामाजिक संस्था, समाज मंडळे, क्रीडा संघटना आदींनी ठिकठिकाणी थंड पाणी शरबत, आदी शित पेयाची व्यवस्था केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील तलावाच्या प्रवेश द्वारावरची रोषनाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (तालुका प्रतिनिधी)