शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांना पालकमंत्र्यांचा दिलासा

By admin | Updated: June 13, 2017 00:30 IST

येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीधारकांची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेवून काळजी करु नका, ...

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीधारकांची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेवून काळजी करु नका, खोलीकरणाची माती झोपडपट्टी बसलेल्या ठिकाणी टाकू देणार नाही, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करु, असे आश्वासन दिले. यामुळे झोपडपट्टीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मूल येथील बसस्थानकाच्या जवळ असलेल्या खुल्या जागेवर काही गरीब व गरजू नागरिक झोपड्या बांधून राहत आहेत. याठिकाणी पाटबंधारे विभागाने तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. तलाव खोलीकरणाच्या कामातून निघालेली माती झोपडपट्टीधारकांच्या घराला लागून टाकण्यात येत आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत कुमरे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून झोपडपट्टीधारकांची समस्या कायम दूर करण्याची मागणी केली होती.राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मूल येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी ना. मुनगंटीवार मूल मध्ये आल्यानंतर शहरातील भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पाडले व रात्री १०.३० वाजताच्या सुमारास झोपडपट्टीधारकांची भेट घेतली. त्यांनी यावेळी झोपडपट्टीधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी मुनगंटीवार यांनी काळजी करु नका, यापुढे पाटबंधारे विभाग या ठिकाणी माती टाकणार नाही. माती टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था करु, असे अश्वासन दिले. झोपडपट्टीधारकांनी यावेळी ना. मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. कार्यक्रमाला आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत कुमरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक पारधी, भावेश गोहणे, पंकज गोहणे, प्रशांत इमलवार, मधूकर मोहुर्ले, नितेश कावळे, निलेश बुटले आदी उपस्थित होते.