शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

भुकेल्यांसाठी देवदूत ठरला तरुणांचा ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:28 IST

दोन वेळेच्या जेवणाने भागविली जातेय भूक प्रकाश काळे गोवरी : माणसाला पोटाची भूक स्वस्थ बसू देत नाही. कोरोना काळात ...

दोन वेळेच्या जेवणाने भागविली जातेय भूक

प्रकाश काळे

गोवरी : माणसाला पोटाची भूक स्वस्थ बसू देत नाही. कोरोना काळात पोटाची भूक भागविण्यासाठी नाइलाजाने कुणी पुढेही येत नव्हते. मात्र, आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त हेतूने ‘आधार तरुणांचा’ हा ग्रुप कार्य करीत आहे. स्वाती मेश्राम हिच्या पुढाकारातून कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण देत नवा आदर्श घडविला जात आहे.

राजुरा येथील स्वाती ऋषी मेश्राम (२५) असे कोरोनाबाधितांसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या तरुणीचे नाव आहे.

कोरोनाने केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणासाठी भटकंती करावी लागत आहे. अशावेळी रुग्णांची आणि नातेवाईकांची होणारी गैरसोय पाहून राजुरा येथील २५ वर्षांच्या स्वाती मेश्राम हिला एक कल्पना सुचली. या कल्पनेतून तिने आपल्या संपर्कातील काही युवा मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप बनविला आणि या ग्रुपला ‘आधार तरुणांचा’ नाव देऊन यामध्ये सर्वांना जोडून घेतले. सुरुवातीला स्वतःहून स्वाती पुढे आली, कुणाकडून कसल्याही प्रकारची मदत न मागता स्वतःच्या घरातून जसे जमेल तसे डबे पुरवीत होती. त्यानंतर आधार तरुणांचा ग्रुप तयार झाला. या सेवाभावी कार्यासाठी मित्रांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत आणि सहकार्य मिळाले. बरेच लोक आधार तरुणांचा या ग्रुपला सहकार्य करू लागले. आतापर्यंत आधार तरुणांचा या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो रुग्णांचा आणि नातेवाईकांना राजुरा परिसरात दोन वेळचे जेवणाचे डबे मोफत पुरविले गेले आहेत आणि हे काम सातत्याने सुरू आहे.

बॉक्स

तरुण भरकटलेला नाही

तरुणांकडे आज समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आजचा तरुण सोशल मीडियामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याला वेळ मिळत नाही. तो सामाजिक जाणीवेपासून कोसो दूर गेला आहे, असे म्हटले जाते. परंतु सामाजिक बांधिलकी जोपासत स्वाती मेश्राम यांनी सुरू केलेला उपक्रम आजचा तरुण भरटकलेला नाही, हे दाखवत आहे. त्यांच्या या उपक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद आहे.