शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिवतीवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:22 IST

जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देनालीद्वारे विहिरीत पाण्याचा भरणा : नालीत मृत जनावरे

शंकर चव्हाण/ संघरक्षीत तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जिवतीसाठी जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शहराच्या बाहेर विहीर आहे. या विहिरीत सध्या तलावातील पाणी नालीद्वारे सोडण्यात येत आहे. ज्या नालीद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. ती नाली पूर्णत: उघडी असून या नालीत मृत जनावरांचे मृतदेह आढळून आले आहे. एवढेच नाही तर अनेक जनावरे या नालीतून ये जा करतात. नालीत बसतात आणि याच नालीतून तलावातील गढूळ पाणी विहिरीत सोडले जाते आणि नंतर विहिरीतून नळाद्वारे नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. मात्र नागरिकांपर्यंत येत असलेले पाणी पूर्णत: गढूळ असून ते पाणी नागरिकांना वापरण्यायोग्य नाही. या दूषित पाण्याने अनेकांना शरिराला खाज सुटली आहे. ही बाब अनेकांनी नगर पंचायतीला लक्षात आणून दिली असली तरी याकडे नगरपंचायतिचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.ज्या नालीतून पाणीपुरवठा केला जात आहे, त्या नालीत चक्क जनावर मरून आहे. ही बाब न. प. च्या लक्षात का येत नाही, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.विकासाची भाषा करणारे नगरसेवक लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत तर या दूषित पाण्याने अनेकांना खाज सुटली असून दवाखान्यात दाखवावे लागत आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरात केवळ दूषित पाणी पुरवठाच नाही तर अनेक वार्डात रस्ते नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी जागोजागी पाहायला मिळते. सध्या पावसाळा सुरू असून नाल्याअभावी पाणी वार्डातच साचून असते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. वार्डात पाणी साचून असल्याने लोकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.जिवती शहराला दूषित पाणी पुरवठा होत आहे, ही शोकांतिका आहे. अनेकदा सांगूनही नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात अनेक समस्या असून त्या समस्या सोडविण्यात नगरपंचायतीला अपयश आले आहे.-विकास डसाने, नागरिक, जिवतीनळयोजनेद्वारे येत असलेले पाणी पूर्णत: खराब येत असून मला या दूषित पाण्याने खूप खाज सुटली. शेवटी मला दवाखान्यात जावे लागले. ही बाब न. प. ला लक्षात आणून दिली. पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे- राजू जाधव, नागरिक, जिवती