शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या पाखरांचे बाबासाहेबांना अभिवादन

By admin | Updated: April 15, 2016 01:08 IST

माणसाला माणुसकीची शिकवण देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरूवारी ...

चंद्रपूर : माणसाला माणुसकीची शिकवण देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरूवारी शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ व्या जयंतीनिमित्त येथे हजारो अनुयायांनी अभिवादन केले.यानिमित्त शहरातील गांधी चौक मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळपासूनच बौद्ध अनुयायांचे जत्थेच्या जत्थे दाखल होत होते. डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करीत होते. यानिमित्त या ठिकाणी आज दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. विविध आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सामूहिक बुद्धवंदना केली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे युथ सोशल फोरम, राजगिरी फाऊंडेशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स चंद्रपूर व थेंब ग्रुपसह चंद्रपूर शहरातील सामाजिक, धार्मिक, कर्मचारी संघटना, बौद्ध मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर मेणबत्त्या उजळून बाबासाहेबांना पुष्प अर्पण केले. जयंती समारोहादरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लहान मुलांनीदेखील भीमगिते सादर केली. भिक्खू संघाच्या धम्मदेसनासह विविध कार्यक्रम यावेळी पार पडले.यासोबतच शहराच्या कानाकोपऱ्यातील बुद्ध विहारात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोषणाई आणि पताकांनी बुद्धविहार सजविण्यात आले होते. शासकीय कार्यालयातदेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, सुनिता लोढीया, अ‍ॅड.विजय मोगरे, संजय रत्नपारखी, केशव रामटेके, वैशाली गेडाम, अ‍ॅड.भास्कर दिवसे, श्रीकांत चहारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)केक कापून जयंती साजरीशहरात आज ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केक कापण्यात आला. शहरातील आंबेडकरी संघटनांतर्फे पंचशिल ध्वजासह मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अनेक युवकांनी दीक्षाभूमीवर एकत्र येऊन जयंती साजरी केली. जयंती समारोहानिमित्त आंबेडकरी संघटनांच्यावतीने शहरात ठिकठिकाणी थंड पाणी, खिर, सरपत, बुंदी व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.‘जय भीम’ चा गजरसायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून वाजत-गाजत रॅली काढण्यात आली. यात हजारो बौद्ध बांधव सहभागी झाले होते. ‘जय भीम’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, बाबासाहब तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणा देत ही रॅली जटपुरा गेटकडे निघाले. मार्गात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पुढे ही रॅली चांदा क्लब ग्राऊंडकडे मार्गस्थ झाली.