शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तालुका हागणदारीमुक्त होऊनही अनुदानासाठी पायपीट

By admin | Updated: May 9, 2017 00:36 IST

कोरपना पंचायत समिती फेब्रुवारी २०१७ मध्ये पूर्णत: हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंग यांनी केली होती.

५३० लाभार्थी : पंचायत समिती स्तरावरून होतेय दुर्लक्ष सतीश जमदाडे। लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : कोरपना पंचायत समिती फेब्रुवारी २०१७ मध्ये पूर्णत: हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंग यांनी केली होती. परंतु कोरपना तालुक्यातील काही गावे हागणदारी युक्त असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच कोरपना पंचायत समिती अंतर्गत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदा येथील लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान अजूनपर्यंत मिळालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाने स्वछ भारत मिशन अंतर्गत प्रत्येकाच्या घरी शौचालय असावे, याकरिता शासनाने १२ हजार रुपये व्यक्तिगत देऊ केले. २०१२ च्या बेसलाईन सर्वेनुसार ज्या नागरिकांचा घरी शौचालय नाही, अशा सर्व नागरिकांना शौचालयाचे बांधकाम करण्यास प्रवृत्त केले. कार्यकारी अधिकारी यांनी घाईने तालुका हागणदारीमुक्त केला असला तरी नांदा गावातील नागरिकांना शौचालय अनुदानासाठी पायपीट करावी लागत आहे. नांदा ग्रामपंचायतीद्वारे ४७५ लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती कोरपनाकडे अनुदान प्राप्तीसाठी पाठविण्यात आली असून एकूण ५७ लाख रुपये अनुदान देय आहे. ५२ लाभार्थ्याचे शौचालय बांधकाम झाले असून त्यांना पंचायत समितीकडून अनुदानसुद्धा प्रस्तावित आहे. उन्हतान्हात मोलमजुरी करून पोटाची खडगी भरायची. कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून शौचालय बांधकामासाठी हातचे पैसेही खर्च केले. मात्र नंतर या लाभार्थ्यांना अनुदानच मिळाले नसल्याने रोष व्यक्त केला जात आहेत. २०१४-१५ मध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या मनमर्जीने लाभार्थी नसलेल्यांनासुद्धा अनुदान दिले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.